
नविन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
मुंबई आग्रा महामार्गावर आज रात्री एका कंटेनरला भीषण आग लागली. सुदैवाने यात कुठलीही जिवित हानी झाली नाही.
मुंबईहून जळगावला कच्चामाल घेऊन जाणारा कंटेनर क्रमांक MH-46AF-7857 च्या कॅॅबीनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कंटेनर चालक मन्नू सिंग( रा अलाहाबाद उत्तर प्रदेश) यांचे वेळीच लक्षात आल्याने प्रसंगावधान राखत कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा केला. घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी अंबड पोलीस ठाण्याचे पथक व अग्निशामक दलाचा बंब पोहोचला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून त्वरित आग आटोक्यात आणली सुदैवाने आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली यावेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.