ओझर विमानतळ परिसरात भीषण आग

आगीवर नियंत्रण
ओझर विमानतळ परिसरात भीषण आग
USER

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज दिनांक 6 मे 2022 रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मौजे ओझर ( Ozar )येथील विमानतळा शेजारी आग ( Fire )लागली सदर आगीमध्ये अंदाजे 40 ते 50 एकर जमिनीवरील गवताला आग लागल्यामुळे सदर गवत जळाले.

सदर आगी मध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसल्याबाबत एचएएल प्रशासनाचे प्रमुख यांनी सांगितले. सदर विमानतळ परिसरामध्ये असलेल्या सोलर प्लांट हा सुखरूप असून त्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

सदरील आग ही धावपट्टी पासून दूर संरक्षक भिंतीच्या लगेच झाल्याने धावपट्टी तसेच एटीसी ला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झालेला नाही. घटनास्थळी HAL यांच्या चार अग्निशामक दल तसेच नाशिक महानगरपालिका यांच्याकडील दोन आणि पिंपळगाव ग्रामपंचायत यांची एक सिन्नर नगरपालिका यांची एक अग्निशामक दल हजर आहेत.

घटनास्थळी HAL प्रशासन प्रमुख तसेच नगरपालिका मुख्याधिकारी तहसीलदार निफाड प्रांत अधिकारी घटनास्थळी हजर आहेत आता आग पुर्ण विझलेली आहे.

Related Stories

No stories found.