मुंबईच्या फॅशन स्ट्रीट परिसरात भीषण आग; दुकानांचे मोठे नुकसान

मुंबई | Mumbai

येथील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट परिसरातील (Fashion Street Area) दुकानांना भीषण आग ( Terrible Fire Shops) लागल्याची घटना घडली आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकमेकांना लागूनच दुकाने असल्याने अनेक दुकाने या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Damage) झाले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह ( Police) अग्निशमन दलाचे कर्मचारी (Fire Fighters) घटनास्थळी उपस्थित असून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच अचानक आग लागल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली होती. पंरतु, त्यानंतर अग्निशमन विभागाच्या सहा गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.