शिवसेना भवन परिसरात 'द बर्निंग कार'चा थरार

शिवसेना भवन परिसरात 'द बर्निंग कार'चा थरार

मुंबई | Mumbai

लोकांची वर्दळ असलेल्या शिवसेना भवानाजवळ (Shivsena bhavan) आज एक गंभीर घटना (critical incident) घडली आहे. सेनाभवन आणि परिसरात नेहमी मोठी वाहतूक, व्यापारी क्षेत्र, राजकीय व्यक्तीची रेलचेल बघायला मिळत असते. अशा गर्दीच्या ठिकाणी आज दुपारी ही घटना घडल्याने एकाच खळबळ उडाली होती....   

मुंबईतील दादर (Dadar) परिसरात असणाऱ्या सेनाभवनासमोर एक प्रवासी चारचाकी वाहन उभे असताना, त्या वाहनाने अचानक पेट घेतला. अगदी काही वेळातच या आगीने भीषण रूप धारण करत, संपूर्ण कार आगीच्या कवेत आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी (police) सतर्कता बाळगत, येथील दुकाने बंद करायला लावली, वाहतूकही थांबवण्यात आली.

ज्या वाहनाला आग लागली ते एक खासगी प्रवासी चारचाकी वाहन (Taxi) होते. हे वाहन सेनाभान बाहेर रस्त्याच्या कडेला उभे असताना, आग लागली. यामुळे वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. कोहिनूर स्केअर (Kohinoor Scare) मधील सुरक्षारक्षकांनी (security guards) पाण्याचा पाईप टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. ही वॅगनआर गाडी होती. यात सुदैवाने कोणीही नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही.

दरम्यानच्या काळात आजूबाजूची दुकानं बंद करण्यात आली. स्थानिकांबरोबरच शिवसेना भवनामधील सुरक्षारक्षकांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. या प्रयत्नांना काही वेळाने यश आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com