Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : द्वारका परिसरात झोपडपट्टीला भीषण आग

Video : द्वारका परिसरात झोपडपट्टीला भीषण आग

नाशिक । Nashik

शहरातील द्वारका परिसरातील (Dwarka area) संतकबीर नगर (Santkabir Nagar) झोपडपट्टीत गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas cylinder explosion) झाल्याने भीषण आग (fire) लागल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास द्वारका परिसरातील संत कबीरनगर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या आगीत आर्थिक नुकसान (financial loss) झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे (fire brigade) सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच झोपडपट्टी भरगच्च असल्यामुळे मागील अर्ध्या तासापासून अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असून आतमध्ये जाण्यास अडचण येत असल्यामुळे आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या