नाशिकमधील मुख्य मार्गावरील कापडाच्या दोन दुकानांना आग

नाशिकमधील मुख्य मार्गावरील कापडाच्या दोन दुकानांना आग

नाशिक

शहरातील एम.जी रोडवरील कापडाच्या दुकानास रविवारी अचानक आग लागली. या आगीमुळे कापडांचे नुकसान झाले असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. इनव्हेटरची बॅटरी फुटल्यामुळे ही आग लागली.

एम.जी.रोडवरील धुमाळ पाईंट येथील राजेशाही या कापडाच्या दुकानास सकाळी ११.३० च्या सुमारास आग लागली. या दुकानाजवळील रस्त्यावर ‘स्मार्ट नाशिक’ रस्त्याचे काम सुरु आहे. तेथे काम करणाऱ्या मजुरांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन विभागाला ही माहिती देण्यात आली. त्यानंतर दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत राजेशाही दुकानातील कापडांचे नुकसान झाले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

राजेशाही व लक्ष्मी कलेक्शन या दोन दुकानांना आग लागली. त्यात दोन्ही दुकानांमधील कापडांचे मोठे नुकसान झाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com