कोल्हापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

नुकतीच नाशिकमध्येही घडली होती अशीच घटना
कोल्हापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

कोल्हापूर | Kolhapur

गेल्या काही दिवसांपासून औद्योगिक वसाहतींमध्ये कंपन्यांना आग लागण्याच्या घटना घडत आहे. नाशिक एमआयडीसीतील जिंदाल कंपनीला नुकतीच आग लागली होती. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता तर १७ जण जखमी झाले होते....

त्यानंतर अवघ्या काहीच दिवसातच कोल्हापूरमधील गोकुळ शिरगाव एमआयडीसीत कंपनीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

कोल्हापूरमधील गोकुळ शिरगाव येथील एका कंपनीला आग लागली आहे. आज दुपारी अचानक Ceraflux India प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आगीचा भडका उडाला.

केमिकल कंपनी असल्याने नागरिकांना परिसरातून सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. या कंपनीच्या शेजारीच एक पेट्रोलियम कंपनी असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

कोल्हापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग
Video : इगतपुरीत कंपनीला भीषण आग; काही कामगार अडकल्याची भीती

काही दिवसांपूर्वीच जिंदाल कंपनीला भीषण आग

काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये जिंदाल कंपनीला भीषण आग लागली होती. तब्बल 24 तासांनंतर ही आग आटोक्यात आली. आगीत दोघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले होते. त्यानंतर एक कर्मचारी बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरु होता. तपासाअंती एका कामगाराचा मृतदेह ढिगाऱ्याखाली आढळून आला होता.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com