Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापेट्रोल पंपाजवळ आग लागल्याने खळबळ

पेट्रोल पंपाजवळ आग लागल्याने खळबळ

मुंबई | Mumbai

येथील परळ परिसरातील (Paral Area) मुख्य चौकात एका पेट्रोल पंपानजीक (Petrol Pump) जमिनीतून (Land) अचानक आगीचा (fire) भडका उडाल्याने खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरातून मुंबई महानगर पालिकेची (Mumbai Municipal Corporation) गॅस पाईपलाईन गेली आहे. त्यामुळे हीच पाईपलाईन फुटल्याची शंका स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ही घटना घडताच पेट्रोल पंपावरील काही कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.

दरम्यान, या घटनेची मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू असून परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. तसेच सावधगिरीचा उपाय म्हणून या भागातील दुकाने बंद करण्यात आली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या