Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशIraq Wedding Fire : लग्नसोहळ्यात अग्नी तांडव! वधू-वरासह वऱ्हाडी होरपळले, १०० जणांचा...

Iraq Wedding Fire : लग्नसोहळ्यात अग्नी तांडव! वधू-वरासह वऱ्हाडी होरपळले, १०० जणांचा दुर्दैवी मृत्यू

दिल्ली | Delhi

उत्तर इराकच्या नेवेहमधील अल-हमदानिया भागात भीषण दुर्घटना घडली आहे. एका लग्न मंडपात भीषण आग लागली असून यात वधू आणि वरासह १०० जणांचा जळून मृत्यू झाला. तर १५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहे. नेवेह प्रांत मोसुलच्या बाहेर राजधानी बगदादपासून जवळपास ३३५ किमी अंतरावर आहे.

- Advertisement -

…अन् ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! मथुरामध्ये विचित्र अपघात

CCTV फुटेजमध्ये लग्नाच्या हॉलमध्ये जळालेला मलबा दिसत होता. आरोग्य अधिकार्‍यांनी सरकारी इराकी वृत्तसंस्थेद्वारे मृतांच्या संख्येबाबत माहिती दिली आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु फटाके पेटवल्यानंतर आग लागल्याचे प्राथमिक अहवालात समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी अधिकाऱ्यांना या दुर्दैवी घटनेमुळे जखमी झालेल्या लोकांना मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहे. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते सैफ अल-बद्र म्हणाले, दुर्दैवी अपघातामुळे बाधित झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदैनी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. निनवेचे प्रांतीय गव्हर्नर नजीम अल-जबौरी म्हणाले की, काही जखमींना प्रादेशिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आगीतील मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.

भाजपला झटका! दक्षिणेतील मोठ्या मित्रपक्षानं सोडली साथ, लोकसभेपूर्वी चिंता वाढली

- Advertisment -

ताज्या बातम्या