
मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या (fire) घटनांचे सत्र सुरु आहे, अशातच आज मुंबईतील गोरेगाव येथे असणाऱ्या फिल्मसीटीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
या फिल्म सिटीमधील टीव्ही मालिकेच्या (TV series) सेटवर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. चिंतेची बाब म्हणजे या आगीत काही कलाकार देखील अडकल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
गोरेगाव फिल्मसिटीत (Goregaon Film City) चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरू असते. यादरम्यान येथे वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरमुळे टीव्ही मालिकेच्या लाकडी सेटला आग लागली असल्याने आगीत संपूर्ण सेट जळून खाक झाला.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशामक दलाचे (Mumbai Fire Brigade) ४ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.