नाशिक : फर्निचर गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान

नाशिक : फर्निचर गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील वडनेर दूमाला रोडवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास एमके फर्निचर मॉल आणि गोदामाला अचानक आग लागली. बघता बघता आगीने प्रचंड रौद्ररुप धारण केले...

लाकडी साहित्य असल्यामुळे आगची भडका उडाला. फर्निचर मॉल आणि गोदाम आगीच्या भक्षस्थानी सापडले. आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली की, दुकानाच्या बाजूला असलेल्या चार ते पाच घरांना हानी पोहोचली. काही वाहनेही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

नाशिक : फर्निचर गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

गोदामाला आग लागल्यानंतर आतमध्ये असलेले पंधरा-वीस जण वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. अवघ्या काही मिनिटात आगीने रौद्ररुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन ते चार बंबांनी आग विझवली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com