मुख्यमंत्र्यांना रिकामचोट बोलणे आमदारांच्या अंगलट

महाविकास आघाडीतर्फे मोर्चासह गुन्हा दाखल
मुख्यमंत्र्यांना रिकामचोट बोलणे आमदारांच्या अंगलट
मुख्यमंत्र्यांना रिकामचोट बोलणे आमदारांच्या अंगलट
खासदार,आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

चाळीसगाव- प्रतिनिधी Chalisgaon

दुधाला जादा दर मिळावा यासाठी महायुतीच्या वतीने दि. १ ऑगस्ट रोजी चाळीसगाव येथे खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. तर आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी एकेरी भाषा वापरत, ‘ रिकामचोट मुख्यमंत्री ’असा शंब्द प्रयोग आपल्या भाषणात केला होता, यांचे पडसाद राज्यभर उमटले असून अनेक शिवसैनिकांनी त्यांना मोबाईलवर कॉल करून याचा जाब विचारत निषेध केला. आज (दि ३ ऑगस्ट)शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या वतीने या घटनेचा निषेध करून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदार व पोलिस निरीक्षक चाळीसगाव यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले,

आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्यावर शिवसेना तालुका प्रमूख रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या विरोधात घोषणा बाजी करून त्यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन करण्यात आले. दरम्यान हे प्रकरण चाळीसगावात चांगलेच तापले असून येणार्‍या न.पा.च्या निवडणुकीत यांचे चांगलेच पडसाद उमटणार आहे. या आदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी या वक्तव्याची मागी मागावी, अशी मागणी यावेळी आदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. तसेच आदोलनादरम्यान काही आदोलनकर्त व पदाधिकारी फोटोसेशनसाठी पुढे-पुढे करत असल्याचे देखील दिसून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com