वादग्रस्त वक्तव्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीने मागितली माफी, म्हणाली…

jalgaon-digital
2 Min Read

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ब्रा आणि देवावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता (Shweta Tiwari Controversial Statement) माफी मागितली आहे. या प्रकरणात तिच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. एका वेब सीरिजच्या इव्हेंटमध्ये श्वेता म्हणाली होती की, ‘माझ्या ब्रा चं माफ देव घेत आहे’. तिच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाद इतका वाढला की, अभिनेत्रीने तिची बाजू सांगण्यासाठी अधिकृत वक्तव्य जारी केलं आहे. ज्यात तिने माफीही मागितली आहे.

श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले…

श्वेताने दिलं स्पष्टीकरण

श्वेता म्हणाली की, तिचा कुणाच्याही धार्मिक भावनांना दुखवण्याचा उद्देश नव्हता. श्वेताने तिच्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागितली आहे. अभिनेत्री म्हणाली की, तिच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं. ती स्वत: देवावर विश्वास ठेवते. असं ती कधीच करू शकत नाही.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री श्वेता तिवारी नुकतंच आपल्या आगामी ‘शो स्टॉपर-मीट द ब्रा फिटर’ या वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळला गेली होती. एका वेबसीरिजच्या घोषणेच्या कार्यक्रमात श्वेता तिवारी आणि इतर कलाकार प्रश्नांना उत्तरं देत होते. त्यावेळी अचानक हसत हसत श्वेता तिवारी वादग्रस्त वाक्य बोलून गेली. ती म्हणाले, ‘माझ्या ब्रा चं माप देवच घेत असेल..’ असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं.

Shweta Tiwari : श्वेता तिवारी या आधीही प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफसाठी राहिली आहे चर्चेत

अभिनेत्रीचं हे वक्तव्य समोर येताच सर्व स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. इतकंच नव्हे तर श्वेताच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा आक्षेप घेतला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *