Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकुख्यात टिप्पर गँगचा लागला निकाल; 'वाचा' सविस्तर

कुख्यात टिप्पर गँगचा लागला निकाल; ‘वाचा’ सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अंबड (Ambad) येथील कुख्यात टिप्पर गँगवर (Tipper Gang) लावण्यात आलेला मोक्का (Mocca) खटल्याचा आज (दि. २८) निकाल लागला….

- Advertisement -

नाशिक जिल्हा न्यायालयाने टिप्पर गँगला मोक्काअंतर्गत शिक्षा सुनावली. या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होतेे. टिप्पर गँगवर झालेल्या कारवाईने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे (Atul Zende) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड (Madhukar Kad) यांनी टिप्पर गँगच्या मुसक्या आवळल्या होत्या. अंबड पोलिसांनी (Ambad Police) २०१६ मध्ये त्यांच्यावर मोक्का अहवाल सादर केला होता. तपासी अधिकार्‍यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

टोळीप्रमुख गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या, किरण ज्ञानेश्वर पेलमहाले, देवदत्त तुळशीराम घाटोळ, मुकेश दलपतसिंग राजपूत, शाकीर नासीर पठाण ऊर्फ मोठा पठाण, हेमंत बापू पवार ऊर्फ सोन्या अणि इतर संशयित आरोपींवर मोक्कान्वये दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ मे २०१६ रोजी फिर्यादी भावसार शुभम पार्क येथून पायी जात होते. त्यावेळी आरोपी आणि वसीम शेख, शाहीद सय्यद, फरहान शेख ऊर्फ दहशत यांनी संगनमत करत टिप्पर गँगचा मोठा पठाणने भावसार यास बोलावत त्याच्याकडे हप्ता मागितला.

सायंकाळपर्यंत पाच लाख दे नाही तर आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्या डोक्यास पिस्तूल लावत, ओरडलास तर खल्लास करून टाकेल, असा दम दिला.

तसेच आरोपीने त्याच्यावर लोखंडी रॉड, तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्याच्याकडील बळजबरीने रक्कम काढून घेतली होती. संशयितानी संघटितपणे कट रचून गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांनी मोक्का कायद्यान्वये दोषारोप सादर करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार तपासी अधिकार्‍यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज या खटल्याचा निकाल लागला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सुधीर कोतवाल यांनी कामकाज पाहिले.

१) गणेश सुरेश वाघ उर्फ गण्या कावळ्या (२६, रा. मोरे मळा, पंचवटी, नाशिक), मुकेश दलपतसिंग राजपूत (२६, रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक), ३) शाकीर नासीर पठाण, (२७, रा, पाथर्डी रोड, नाशिक) हे गुन्ह्यात दोषी आढळले.

आरोपी गणेश वाघ व शाकीर पठाण यांना झालेली शिक्षा

  • भादवि कलम ३०७, ३४ प्रमाणे १० वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ३,००० रू. दंड, दंड न भरल्यास ०६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

  • भादवि ३८७,३४ प्रमाणे ०५ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी २,००० रू. दंड व दंड न भरल्यास ०२ महिने सश्रम कारावासाची शिक्षा.

  • भादवि ५०६ (२), ३४ प्रमाणे ०६ महिने सश्रम कारावास व प्रत्येकी ५००/- रु दंड व दंड न भरल्यास ०१ महिना साधा कारावास

  • भादवि ४२६, ३४ प्रमाणे ०१ महिना सश्रम कारावास.

  • भादवि ३९७ प्रमाणे ०८ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ३,०००रू. दंड व दंड न भरल्यास ०६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा.

  • महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (¡¡) प्रमाणे १० वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ५,००,०००रू दंड व दंड न भरल्यास ०२ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

  • महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(४) प्रमाणे ०८ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ५,००,००० रू.दंड व दंड न भरल्यास ०२ वर्ष सश्रम कारावास.

मुकेश दलपतसिंग राजपूत यास झालेली शिक्षा

  • महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(४) प्रमाणे ०८ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ५,००,००० रू.दंड व दंड न भरल्यास ०२ वर्ष सश्रम कारावास.

- Advertisment -

ताज्या बातम्या