Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकऱ्यांना लाखाऐवजी पाच हजारच कर्ज

शेतकऱ्यांना लाखाऐवजी पाच हजारच कर्ज

वेळुंजे | Velunje

यंदा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांनी आखडता हात घेतला आहे.

- Advertisement -

यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समाधानकारक कर्ज वाटप केल्याचे संकेत जरी शासन व प्रशासनाने दिले असले तरी यात त्रंबकेश्वर तालुका हा मात्र अपवादात्मक आहे. येथील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करून कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थावर नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे एकरी भात पिकासाठी सतरा हजार व टमोटो पिकासाठी एकरी पंचवीस हजार रुपये इतकी तरतूद आहे. या अनुषंगाने असतांना शेतकऱ्यांना एक ते दीड लाख रुपयांची गरज असतांना केवळ तीन हजार ते पाच हजार रुपये दिले जात आहेत. तर काही शेतकऱ्यांनी यास नकार देऊन कर्ज नको म्हणून निषेध नोंदवला आहे.

एकीकडे सामान्य शेतकऱ्यांची अशी अवस्था असताना संस्था चालकांचे लागेबांधे असलेल्या सधन शेतकऱ्यांना मात्र भरघोस कर्ज या संस्था देताना असतात, अशी तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे.

तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यात सहकार क्षेत्र बळकट होत असतानाच अचानक सन २०१४ पासून सहकाराला उतरती कळा लागली आहे. यास कारण तालुक्यातील नेत्यांची उदासीनता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांचे चित्र हे फार विदारक असून येथील बऱ्याच संस्थांचे संचालक व पदाधिकारी हे स्वतः चे पोट भरण्यात गुंतले आहेत. त्यामुळे हे अनेक वर्षाचे कुटील राजकारण थांबले पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांची दुरावस्था होईल. या सहकारी संस्था वाचविण्यासाठी तरुण युवकांनी सहकार क्षेत्राचा अभ्यास करून यात सहभागी होणे फार महत्वाचे आहे.

– नवनाथ कोठुळे, चेअरमन, त्र्यंबक विविध कार्यकारी संस्था

सहकार क्षेत्रात प्रत्येकजण स्वतःच हित साधतांना दिसतो आहे. आदिवासी सहकारी विविध संस्थावरील आदिवासींचा हक्क डावलला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होरपळ थांबण्यासाठी तरुण नेतृत्व उभे राहिले पाहिजे.

– देविदास जाधव, शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या