अखेर नवीन घंटागाड्यांना 'या' तारखेचा मुहूर्त

अखेर नवीन घंटागाड्यांना 'या' तारखेचा मुहूर्त

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) कार्यक्षेत्रातील कचरा संकलन (Garbage collection) करुन कचरा डेपोमध्ये टाकण्यासाठी घंटागाड्यांचा (Ghanta Gadi) नव्याने ठेका देण्यात आला आहे.

ठेकदारांना गाड्यांची दुरूस्ती तसेच नव्या गाड्या खरेदी करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामुळे शहरात नवीन घंटागाड्यांसाठी पंधरा ऑगस्ट हा मुहूर्त मिळणार असल्याचे समजते.

घंटागाडी (Ghanta Gadi) साठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नव्याने देण्यात येणार्‍या ठेक्यात घंटागाडीची संख्या तब्बल 397 असणार आहे. यापूर्वी 268 गाड्यांवर नाशिक शहरातील (nashik city) कचरा संकलनाची जबाबदारी होती. घंटागाड्यांची संख्या वाढणार असल्याने प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी जाऊन या माध्यामातून कचरा उचलला जाणार आहे. छोट्या गाड्यांची संख्या वाढणार असल्याने यापुर्वी ज्या समस्यांना सामोरे जावे लागत होते, त्यातून सुटका होणार आहे.

जुन्या ठेक्यात अवघ्या 18 छोट्या घंटागाड्या होत्या. हीच संख्या 83 वर पोहोचली आहे.त्यामुळे छोट्या गल्ल्यांमध्ये असलेल्या कचर्‍याचे संकलन (Garbage collection) थेट घंटागाडीमध्ये होणार आहे. नाशिकरोड (nashik road), पंचवटी (panchavati), पूर्व, पश्चिम, सिडको (CIDCO), सातपूर (satpur) या सहा विभागात 397 घंटागाड्या धावणार आहेत. नाशिक पूर्व विभागातून दररोज 115 टन, नाशिक पश्चिम 80 टन, नाशिकरोड 100, पंचवटी 122,सिडको 130 व सातपूर विभागातून 89 टन कचरा संकलन केले जात आहे.

पाच वर्षात वाढलेले शहरीकरण, लोकसंख्या यामुळे ठेक्याची रक्कम वाढविण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. 15 ऑगस्ट नंतर सुरू होणार्‍या नवीन ठेक्यात 199 मोठ्या गाड्या असणार आहे. तर शहरातील उद्यानातील कचरा उचलण्यासाठी 33 घंटागाड्या, 83 छोटी वाहने, डेब्रिजसाठी 6,हॉटेलमधील कचरा उचलण्यासाठी 24, सार्वजनिक ठिकाणी पडून असलेला कचरा यासाठी 36 व ईतर 6 अशा 397 घंटागाड्या कचरा संकलनासाठी राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com