अखेर 'त्या' चौफूलीवर उड्डाण पूल मंजूर

अखेर 'त्या' चौफूलीवर उड्डाण पूल मंजूर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हॉटेल मिरची चौकातील गंभीर अपघातानंतर (accident) औरंगाबाद रोडवरील (Aurangabad Road) वाहतूकीला अडथळा ठरणार्‍या अतिक्रमण (Encroachment) हटवण्याच्या नोटीसी (notice) बजावण्यात आल्या.

त्या पार्श्वभूमीवर आ. राहुल ढिकले (MLA Rahul Dhikle) यांनी राज्य शासनाकडे पाठपूरावा करुन तीन पूलांपकी पहिल्या टप्पात अती संवेदनशिल नांदूर नाका (nandur naka) चौफूलीवर उड्डाणपूलाला (flyover) मंजूरी मिळवली आहे. राज्यशासनाने 50 कोटींच्या निधीची तरतूद केली असून, लवकरच निवीदा (tender) काढून बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आ. राहुल ढिकले यांनी सांगितले.

नाशिकमधील मिरची चौकात बस अपघातात (bus accident) सुमारे 40 जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडलेली होती. त्याचे तिव्र पडसाद उमटले होते. मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आ. राहुल ढिकले यांनी या मार्गावर तीन पूलांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यात संत जनार्दनस्वामी मठ ते नांदूर नाका असा थेट उड्डाणपूल (flyover करावा किंवा मिरची चौक, जुना वड बसथांबा आणि नांदूर नाका या तिन ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्तावसादर केला होता.

प्रत्यक्षात या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढलेल्या आहेत. तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालये आहेत. विवाह सोहळ्यासाठी येणार्‍या पाहुण्याच्यया गाड्यांमुळे या भागात वाहतूक कोंडी (traffic jam) नित्याचीच झालेली आहे. परिसरात असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स, या तीनही चौकातील सूमारे 10 ते 15 मंगल कार्यालये त्यामुळे या तिनही चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याने परिसरातील नागरिकांना व व्यवसायीकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

या समस्येवर ठोस मार्ग काढण्याची मागणी नागरिक करीत होते. हा दृष्टीकोन लक्षात घेत या भागातील वर्दळीच्या तीनही चौकात उड्डाण पूल उभारल्यास वाहन चालकांसाठी सूक्षित प्रवास करणे शक्य होणार असल्याची मागणी लोकांनी रेटून धरलेली होती.

औरांबाद रोडवरील परिस्थितीची जाणीव करुन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे तीन पूलांसाठी पाठपूरावा केला होता. त्यांनी पहिल्या टप्पात नांदूर नाका चौफूलीवर उड्डाण पूलास मंजूरी दिली आहे.

- आ. अ‍ॅड. राहुल ढिकले, नाशिक पूर्व

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com