Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याअखेर राम मंदिराची तारीख ठरली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले...

अखेर राम मंदिराची तारीख ठरली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले जाहीर

दिल्ली : Delhi

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी अयोध्या येथे निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराची (Ram temple) तारीख जाहीर केली आहे. त्यांनी सांगितले की, १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर तयार होईल.त्रिपुरामधील लोकांनी आताच तिकीट बुक करुन ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. अमित शाह म्हणाले की, २०१९ साली मी भाजपाचा अध्यक्ष होतो. तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे की, “मंदिर वहीं बनाएंगे, तिथि नहीं बताएंगे”. तर राहुल गांधी आता कान उघडून ऐका, १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्यामध्ये गगनचुंबी राम मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल.”

- Advertisement -

अमित शाह म्हणाले की, “फक्त राम मंदिरच नाही, तर एक-दोन वर्ष जाऊद्या माँ त्रिपुरी सुंदरी देवीचेही भव्य असे मंदिर बनवू. ते पाहण्यासाठी जगभरातून लोक इथे येतील. आम्ही काशी विश्वनाथ कॉरिडोर बनवला. महाकाल कॉरिडोर बनवला. सोमनाथ आणि अंबा मातेचे मंदिर सोन्याचे होत आहे. माँ विंध्यवासिनीचे नवीन मंदिर बनत आहे.”

अनेक वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराच्या उभारणीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन केले आणि मंदिराची पायाभरणी केली. आता १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले की, मंदिर निर्माण करण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. सध्या ३५० मजूर आणि कारागीर दिवसरात्र एक करुन काम करत आहेत. यासोबतच साधारण एक हजार मजूर आणि कारागीर राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील वंशी पहाडपूर येथे काम करत आहेत. याठिकाणी मंदिरात वापरण्यात येणाऱ्या पाषाणांना आकार देण्याचे काम करत आहेत. इथूनच मंदिरासाठी लागणारे पिंक स्टोन आणले जाणार आहेत, अशीही माहिती मिश्र यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या