Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशMBBS विद्यार्थ्यांना कोविडचे काम देण्यास मंजुरी

MBBS विद्यार्थ्यांना कोविडचे काम देण्यास मंजुरी

नवी दिल्ली:

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, परिचारिकांची कमतरता होऊ नये यासाठी MBBS च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना कोविडचे काम देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांना काम कोविड संक्रमित रुग्णांवर उपचार करता येणार आहे.

- Advertisement -

वरिष्ठ डॉक्टरांच्या उपस्थितीत बीएससी / जीएनएम योग्य परिचारकांनाही कोविड निर्सिंगसाठी उपयोग करुन घेण्यात येणार आहे.

जाणून घ्या महत्वाचे निर्णय

1) NEET-PG परीक्षा कमीत कमी चार महिने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

2) १०० दिवस कोरोना ड्यूटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरभरतीत प्राधान्य देण्यात येणार आहे.

3) वरिष्ठ डॉक्टर आणि नर्स यांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोरोना नर्सिंगमध्ये BSc/GNM परिचारिका वापरल्या जाऊ शकतात.

4)ड्युटीवर असणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने लस दिली जाईल. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्राच्या विमा योजनेत समाविष्ट केले जाईल.

5) पीजी विद्यार्थ्यांच्या नवीन बॅच जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत अंतिम वर्षाच्या पीजी विद्यार्थ्यांना सेवेत वापरले जाऊ शकते.

6) कोविड रुग्णांच्या सेवेत १०० दिवस काम पूर्ण करणारे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या