Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअंतिम वर्ष परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

अंतिम वर्ष परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणार्‍या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

13 ऑक्टोबरपासून या परीक्षांना सुरूवात होणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही परीक्षा एकाच वेळी होणार आहेत.

विद्यापीठातर्फे पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांमधील अंतिम वर्षाच्या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. 1 लाख 93 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, तर 40 हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाइनचा पर्याय निवडला आहे.

तर उर्वरित सुमारे 17 हजार जणांनी पर्याय निवडलेला नाही. ऑनलाइन परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 114 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. विद्यापीठातर्फे जवळपास सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले असून, ऑफलाइन परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयातून प्रवेश पत्र (हॉल तिकीट) मिळणार आहे.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने एजन्सी निश्चित केली असून या एजन्सीकडून विद्यापीठात स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या