इगतपुरी - कसारा टनल प्रस्तावाच्या सर्वेक्षणाला अंतिम मंजुरी

इगतपुरी - कसारा टनल प्रस्तावाच्या सर्वेक्षणाला अंतिम मंजुरी

नाशिक । Nashik

मुंबई ते नाशिक (Mumbai to Nashik) या प्रवासासाठी प्रवाशांना अडचणीचा ठरणारा इगतपुरी - कसाऱ्या (Igatpuri - Kasara) दरम्यानच्या लोहमार्गावर १ : १०० ग्रेडीयंट क्षमतेचा टनल व्हावा यासाठीच्या प्रस्तावास रेल्वे बोर्डाने (Railway Board) जागा सर्वेक्षणाला अंतिम मान्यता दिली असून याकामी ६४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. इगतपूरी - कसारा (Igatpuri to Kasara) हे अंतर १६ किमीचे असून या दरम्यान १ : १०० ग्रेडीयंटचा टनल (Gradient tunnel) झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि बॅकरवर होणारा खर्चही वाचणार असल्याची माहीती खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी दिली आहे...

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी (Financial capital) असल्याने मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरून ये - जा करणाऱ्या रेल्वे गाडयांची आणि प्रवाशांची संख्या मोठी आहे. या सर्व रेल्वेगाडयांना इगतपुरी ते कसारा या दरम्यानच्या लोहमार्गावरूनच धावावे लागते. इगतपुरी ते कसारा हे १६ किमीचे अंतर असून या घाट परिसरात (Ghat Area) पूर्वीपासून असलेले टनल हे कमी व्यासाचे आहेत. यामुळे रेल्वे गाडयांना वाढीव इंजिन, बॅकर्स लावण्याची गरज असते. परिणामी इगतपूरी - कसारा या घाट परिसरात सतत रेल्वेगाडया थांबवाव्या लागत असल्याने प्रवासास विलंब होतो. याबरोबरच बँकरवर मोठा खर्चही होतो. यावर उपाय म्हणून कसारा ते इगतपुरी या दरम्यान १.३७ एवजी १.१०० गेंडीयंट क्षमतेचा मध्ये टनल व्हावा अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून खा.गोडसे केंद्राकडे करत होते.

तसेच खा. गोडसे यांनी वेळोवेळी रेल्वेबोर्डच्या अधिका-यांकडे सततचा पाठपुरावा केल्याने त्यांची ही मागणी न्यायीक असल्याने कसारा - इगतपूरी या दरम्यानच्या ग्रेडीयंट टनलच्या सर्वेक्षणाच्या प्रस्तावास तात्पुरती मान्यता दिली होती. कसारा - इगतपूरी या दरम्यानच्या ग्रेडीयंट टनलच्या सर्वेक्षणाला अंतिम मान्याता देवून याकामी निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही महिन्यांपासून खा.गोडसे केंद्राकडे (Central Government) सातत्याने प्रयत्नशिल होते. त्यांचा सततचा पाठपुरावा व आवश्यकता लक्षात घेऊन आज रेल्वेबोर्डाने इगतपुरी - कसारा या लोहमार्गावर १ : १०० ग्रेंडीयंट क्षमतेचा टनल प्रस्तावाच्या सर्वेक्षणाला अखेर अंतिम मान्यता दिली असून या कामासाठी ६४ लाखांच्या निधीला देखील मंजुरी दिली आहे.

दरम्यान, रेल्वेबोर्डाच्या या निर्णयामुळे लवकरच टनल प्रस्ताव (Tunnel proposal) सर्वेक्षणाचे काम पूर्ण होणार असून घाट परिसरात अधिक व्यासाच्या टनलची निर्मीती होणार आहे. यामुळे मुंबई - नाशिक दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाडयांना (Trains) घाट परिसरात सतत थांबावे लागणार नसून गाडयांना बॅकरही लावण्याची गरज पडणार नाही. परिणामी प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे. तसेच टनल उभारणी झाल्यावर मुंबईहून कसाऱ्यापर्यंत धावणारी लोकल नाशिकपर्यत धावणे शक्य होणार असून या प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रूपये खर्च येणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. याबरोबरच इगतपुरी - कसारा या दरम्यान चौथी व पाचवी रेल्वे लाईन वाढविण्याचा प्रस्ताव रेल्वेप्रशानाच्या विचाराधीन आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com