टार्जन फेम अभिनेते हेमंत बिर्जे यांच्या कारला भीषण अपघात

टार्जन फेम अभिनेते हेमंत बिर्जे यांच्या कारला भीषण अपघात

कारवरील ताबा सुटल्याने टार्जन फेम अभिनेते हेमंत बिर्जे (Hemant Birje) आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा अपघात (Accident)झाला. यामध्ये हेमंत आणि त्यांची मुलगी रेश्मा व पत्नीला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

टार्जन फेम अभिनेते हेमंत बिर्जे यांच्या कारला भीषण अपघात
रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर नवी मुंबईवरून पुण्याला येताना उर्से गावच्या हद्दीत अतिवेगाने जाणाऱ्या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये एकूण तीन जण गंभीर जखमी झाले असून अपघातात जखमी झालेल्यांमध्ये जुना 'टार्जन'चित्रपटातील अभिनेता हेमंत बिर्जे, त्यांची पत्नी अमना व मुलगी रेश्मा तारिक अली खान यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी पवना हाँस्पिटलला दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीचा चक्काचूर झाला आहे. अभिनेते हेमंत बिर्जे हे मुंबईवरून पुण्याला कुटुंबासह जात होते. अपघातामुळे काही काळ एका लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com