Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याबालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

लखमापूर । वार्ताहर Lakhmapur / Dindori

अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना काळात दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथे सुदाम शंकर पंडित यांच्या घरी त्यांचे जावई संजय बिडवे, मुलगी संगीता संजय बिडवे, नातू किरण संजय बिडवे (सर्व रा. खंबाळेवाडी, घोटी, तालुका इगतपुरी) आले होते.

- Advertisement -

या दरम्यान ज्योती पितांबर जाधव (रा.लखमापूर फाटा, मुळगाव जळगाव) यांनी सुदाम शंकर पंडित यांचे घराचे पडवीत दि. 2 मे 2020 रोजी मुलगी रेणुका हिचे (वय 13 वर्ष 3 महिने) बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून लाऊन दिला. याप्रकरणी करंजवन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांनी दि. 22 जानेवारी 2021 रोजी वणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी किरण संजय बिडवे, संजय बिडवे, संगीता बिडवे व मुलीची आई ज्योती पितांबर जाधव यांचे विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदरचा प्रकार अल्पवयीन मुलगी गायत्री उर्फ रेणुका किरण बिडवे, तिची सासू संगीता बिडवे, सासरा संजय बिडवे, नवरा किरण बिडवे हे खंबाळेवाडी येथून सुदाम शंकर पंडित हे मयत झाल्याने त्यांचे विधी करता करंजवन येथे आले होते. यादरम्यान पहाटे गरम पाण्याचा ड्रम सांडल्याने मुलगी गायत्री उर्फ रेणुका व तिची नणंंद प्रतीक्षा बिडवे यांच्या पाठीला दुखापती झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी तसेच बाल कल्याण समिती नाशिक यांनी मुलीचे जबाब घेतले असता, मुलगी रेणुका हिचा बालविवाह झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी करंजवन ग्रामविकास अधिकारी अरूण आहेर यांना चौकशी करण्यास सांगितले. चौकशीअंती मुलगी रेणुका हिचा बालविवाह किरण संजय बिडवे याच्याशी चोरून झाला असे उघड झाल्याने. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या