Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, भाजप नेत्याची पोलिसात तक्रार

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, भाजप नेत्याची पोलिसात तक्रार

मुंबई :

भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तीन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावू, असं भातखळकर म्हणाले.

- Advertisement -

४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

साकीनाका प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आयोजित गृह विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी …यापुढे परप्रांतीयांची नोंद ठेवा. राज्यात बाहेरुन कोण येतो? कुठून येतो? कुठे जातो?’ याची नोंद ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर महिलांचे शोषण करणारे शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत? मुख्यमंत्र्यांविरोधात कलम 154अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असे अतुल भातखळकर यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला सामना या दैनिकात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या