पीक विमा संरक्षणासाठी वेळेत तक्रार दाखल करा- जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

पीक विमा संरक्षणासाठी वेळेत तक्रार दाखल करा- जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या (PM Crop Insurance Scheme)खरीप व रब्बी हंगाम 2022-23 करिता विमाक्षेत्र अधिसूचित करून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत पिकांच्या झालेल्या नुकसानीला विमा संरक्षण मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी संबंधित कंपनीच्या तालुका व जिल्हास्तरीय विमा प्रतिनिधींशी वेळेत संपर्क साधून तक्रार दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016-17 हंगामापासून लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पिकांचे काढणी पश्चात व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्‍या नुकसानीसाठी पीक विमा संरक्षण देण्यात येणार असून यामध्ये पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादींमुळे उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या योजनेत खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, भुईमूग, सोयाबीन, कारळा, मूग, उडीद, तूर, कापूस व कांदा या पिकांसाठी विमा संरक्ष प्राप्त झाले असून जिल्ह्यात या योजनेंतर्गत 1 लाख 65 हजार 60 शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविला आहे.

हवामान घटकाच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान तसेच पिकांचे काढणीपश्चात व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान इत्यादी बाबींचा या योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. याकरिता शेतकर्‍यांनी नियुक्त करण्यात आलेल्या एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कंपनीकडे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत पोर्टलवर तक्रार दाखल करावी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com