photos # गुन्हा दाखल करण्यासाठी तुमच्या पाया पडू का?

दूध संघ गैरव्यवहारप्रकरणी आ. खडसेंचा पोलीस ठाण्यात ठिय्या
photos # गुन्हा दाखल करण्यासाठी तुमच्या पाया पडू का?

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दुध संघात (milk union) लोणी व दुधाच्या भुकटीच्या साठ्यात (stock of butter and milk powder) एक ते दीड कोटींचा गैरव्यवहार (malfeasance) झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे (NCP leader MLA Eknathrao Khadse) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला होता. दरम्यान, हा घोटाळा अधिकार्‍यांच्या पातळीवरील असून गुन्हा दाखल (Filed a case) न करण्यासाठी पोलिसांवर दबाव (Pressure on the police) असल्याचा खळबळजनक आरोप करीत आमदार एकनाथराव खडसे यांनी गुरूवारी दुपारी 4 वाजेपासून जळगाव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या (Stayed at the city police station) मांडला. दरम्यान हतबल झालेल्या पोलीस प्रशासनाला ‘गुन्हा दाखल करण्यासाठी तुमच्या पाया पडायचे का? अशा शब्दात खडसेंनी आक्रमक भूमिका घेतली.

दुध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी पत्रकार परिषद घेवून कोल्ड स्टोअरेजला पाठवलेले लोणी तसेच दुधाच्या भुकटीच्या साठ्यात गैरव्यवहार झाला असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याचे सांगितले होते. जवळपास एक ते दीड कोटींचा हा गैरव्यवहार असून त्याबाबतची फिर्याद देण्यासाठी चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी बुधवारी शहर पोलिसात धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी याविषयात कुठलाही गुन्हा दाखल केला नव्हता. दरम्यान,चेअरमन यांची फिर्याद न घेतल्याने खुद्द राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे हे दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये व कार्यकर्त्यांसह गुरूवारी दुपारी 4 वाजता शहर पोलीस ठाणे गाठले.

याठिकाणी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड हे उपस्थित नव्हते. त्यांना फोन करून बोलावून घेण्यात आले. पोनि ठाकुरवाड तेथे आल्यानंतर आमदार खडसे यांनी फिर्याद का दाखल करून घेत नाही? असा जाब विचारत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर आरोप केले. तुम्ही आरोपींना पाठीशी घालत आहात, तुमच्यामुळेच आरोपी फरार होण्यात यशस्वी झाल्याचा आरोपही आमदार खडसे यांनी पोलीस प्रशासनावर केला.

तो फोन कुणाचा ?

बुधवारी चेअरमन आणि दुध संघाचे एमडी फिर्याद देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात आले होते. यादरम्यान पोनि ठाकुरवाड यांना कुणाचा तरी फोन आला आणि त्यांनी फिर्याद दाखल करून घेण्यास नकार दिल्याची माहिती आमदार खडसे यांनी दिली. फिर्याद दाखल करू नका यासाठी कुणाचा फोन आला? असा सवालही आ. खडसे यांनी उपस्थित केला.

अप्पर पोलीस अधीक्षकांशी चर्चा

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे आज बाहेरगावी होते. तर अप्पर पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा हे देखिल रजेवर असल्याने अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी खडसेंशी चर्चा केली. मात्र, खडसेंनी गुन्हा दाखल केल्याशिवाय उठणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेतला.

आ.खडसेंची रक्तदाब तपासणी

गुरूवारी दुपारी 4 वाजेपासून आमदार एकनाथराव खडसे यांनी शहर पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता. याठिकाणीच त्यांनी वडापावचा नास्ताही केला. दरम्यान खडसेंचे वय लक्षात घेता डॉ. अभिषेक ठाकुर यांनी त्यांची रक्तदाब तपासणीही केली. या तपासणीत आ. खडसेंचा रक्तदाब वाढल्याने त्यांना नारळ पाणी देण्यात आले.

आ. भोळेंचीही शहर पोलीस ठाण्यात एन्ट्री

जळगाव जिल्हा दूध संघात तुपाप्रमाणे 14 टन लोणी (बटर) व 9 टन दूध पावडरचा माल परस्पर विक्री करून दूध संघाची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी मंगळवारी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे केली होती. दोन दिवस उलटूनही याबाबत गुन्हा दाखल न केल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा दुध संघाचे संचालक आमदार राजूमामा भोळे यांनीही गुरूवारी सायंकाळी जळगाव शहर पोलीस ठाणे गाठले.

याठिकाणी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्याकडे त्यांनी संताप व्यक्त करीत आ. मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा का दाखल करीत नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर पोनि विजयकुमार ठाकुरवाड यांनी तीन दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन आ. राजुमामा भोळे यांना दिले.

यावेळी महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, नगरसेविका उज्वला बेंडाळे, अ‍ॅड. शुचिता हाडा, दीपमाला काळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com