तृतीयपंथीय लसीकरणात अव्वल; नाशिक विभागात 'इतक्या' लसी टोचल्या

तृतीयपंथीय लसीकरणात अव्वल; नाशिक विभागात 'इतक्या' लसी टोचल्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

विभागीय स्तरावरील तृतीयपंथी कल्याण (Transgender) व त्यांच्या हक्काचे संरक्षण कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले. या कल्याण मंडळाचा देखील आढावा घेण्यात आला...

नाशिक विभागात (Nashik Division) एकूण 600 तृतीयपंथीयांची (Transgender) संख्या असून त्यापैकी 340 तृतीयपंथीयांना कोविड लसीकरण (Vaccination Completed) पूर्ण झाले आहे.

त्याचप्रमाणे विभागात 7 व्यक्तींना ओळख प्रमाणपत्र देण्यात आले आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna game) यांनी तृतीयपंथी व्यक्तीच्या कल्याणासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

यावेळी विभागीय समितीच्या सदस्य शमिना पाटील (जळगाव) यांनी तृतीयपंथीयाना येणा-या अडचणी व सामाजिक प्रश्नबाबत उपस्थिताना माहिती करुन दिली. त्यांच्या सुचनांच्या अनुषंगाने विभागातील सर्व जिल्ह्यात यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याच्या सुचना विभागीय आयुक्त गमे यांनी संबंधित यत्रणांना दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com