Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअन् चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ५० प्रवाशांचे प्राण

अन् चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ५० प्रवाशांचे प्राण

पुणे | Pune

नाशिक-पुणे (Nashik-Pune Highway) महामार्गावरून राज्य परिवहन महामंडळाची बस (MSRTC) पुण्याच्या दिशेने जात असताना बसचा गिअर बॉक्स चालू स्थितीत अचानक तुटून पडल्याने अपघात घडला. मात्र,चालकाच्या प्रसंगावधानामुळे ५० प्रवाशांचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला आहे…

- Advertisement -

शरद पवारांच्या अदानी समूहाबाबतच्या भूमिकेमुळे मविआत फूट पडणार? राऊत म्हणाले…

याबाबत अधिक माहिती अशी की, कुर्ला नेहरूनगर (Kurla Nehrunagar) येथून पिंपळगाव रोठासाठी ५० प्रवाशांना घेऊन निघाली होती. त्यावेळी ही एसटी बस मंचर गावाच्या पुढे आल्यावर पांजरपोळच्या सर्विस रोडला लागताच बसचा गिअरबॉक्स अचानक तुटून खाली पडल्याने तुकडे पडले.

अजित पवारांनी ‘नॉट रिचेबल’च्या वृत्तावर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

त्यामुळे त्यातील इंजिन ऑईल रस्त्यावर सर्वत्र पसरले. त्यावेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांचा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्या ऑईलवर तात्काळ माती टाकली. तसेच बस चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.

शरद पवारांचे नाशकात आगमन

दरम्यान, सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने प्रवाशांकडून एसटीच्या सुरक्षीततेबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर एसटी महामंडळाच्या अनेक बसेस या आता कालबाह्य झालेल्या असून त्यांची आता जिर्ण अवस्था झाली आहे. त्यामुळे बसेसच्या इंजिनची वेळेत देखभाल न केल्याने आगारातून बस निघण्यापूर्वी तपासणी का केली जात नाही असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या