Monday, April 29, 2024
Homeक्रीडाIPL 2023 : आयपीएलमध्ये आज पाचवा डबल हेडर; 'हे' संघ आमनेसामने

IPL 2023 : आयपीएलमध्ये आज पाचवा डबल हेडर; ‘हे’ संघ आमनेसामने

मुंबई | Mumbai

आयपीएल १६ मध्ये आज शनिवारी २२ रोजी डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स संघांमध्ये लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स आयपीएल १६ मध्ये तिसाव्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

- Advertisement -

आयपीएल २०२३ मध्ये आपल्या सलामीच्या ३ सामन्यात सलग विजय संपादन करणाऱ्या गुजरात टायटन्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरात टायटन्स मागील २ सामन्यातील पराभवाची मालिका खंडित करून विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी सज्ज असणार आहे.

धक्कादायक! क्रिकेट खेळताना अवघ्या १४ वर्षाच्या चिमुरड्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

लखनऊ सुपरजायंट्स संघाने आपल्या अखेरच्या सामन्यात पंजाबकिंग्ज संघाविरुद्ध १० धावांनी विजय संपादन करून विजयी लय प्राप्त केली आहे. आता गुजरात टायटन्सविरुद्ध विजय संपादन करून आयपीएलमधील आपला पाचवा सामना जिंकून अव्वल २ संघांमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी लखनऊ सज्ज असणार आहे.

“जनतेच्या मनातील मुख्यमंत्री…”; पुण्यात अजित पवारांच्या बॅनरमुळे पुन्हा चर्चांना उधाण

मुंबई इंडियन्स आणि पंजाबकिंग्जमध्ये दुसरा सामना

तर शनिवारी दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाबकिंग्ज संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघांविरुद्ध सलग २ सामन्यात पराभव स्वीकारून पिछाडीवर पडलेल्या मुंबई इंडियन्स संघाने जबरदस्त कमबॅक केले आहे. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स, सनराईझर्स हैद्राबाद दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध शानदार विजय साकारला आहे.

… तर अजितदादा मुख्यमंत्री होणार; ‘या’ भाजप नेत्याचे मोठे विधान

तसेच पंजाबकिंग्ज संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर , लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध पराभव स्वीकारला आहे. आता पराभवाची हॅट्रिक टाळण्याचा पंजाबकिंग्ज संघाचा इरादा असणार आहे. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई सज्ज असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाबकिंग्ज संघांमध्ये २९ सामने झाले असून पंजाबकिंग्जने १४ तर मुंबईने १५ सामन्यात विजय संपादन केला आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या