Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यादिवाळीत ऑनलाइन खरेदी करतांना हे लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते फसवणूक

दिवाळीत ऑनलाइन खरेदी करतांना हे लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते फसवणूक

दिवाळीमध्ये ऑनलाइन खरेदी (online website)वाढवण्यासाठी अनेक ऑफर आणि सेल (offer)येतात. परंतु या फेस्टिव्ह सीझनच्या (festival)निमित्ताने बनावट ई-कॉमर्स वेबसाइट्स सक्रीय झाल्या आहे. या बनवाट वेबसाईटच्या माध्यमातून स्मार्टफोन, एक्सेसरीज आणि घड्याळांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • URL मध्ये https:// (एसचा अर्थ सुरक्षित आहे) असल्यास ती वेबसाइट सुरक्षित आहे.

    - Advertisement -
  • Amazon, Flipkart, ShopClues, Pepperfry सारख्या लोकप्रिय साइटवरूनच खरेदी करावी. नवीन वेबसाइटवरून शॉपिंग केल्यास फसवणूक होऊ शकते.

  • तुमच्या सिस्टममध्ये अँटी-व्हायरस अपडेट ठेवा. तसेच कोणतीही इतर माहिती मागितल्यावर सावध व्हा.

  • अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.

  • व्हॉट्सऍप, फेसबुक सारख्या ऍप्सवर तुमच्या बँक खात्याची माहिती शेअर करू नका.

  • कोणतीही वस्तू कधीच मोफत मिळत नसते, हे नेहमी लक्षात ठेवा.

क्रेडिट कार्डचा वापरतांना ही खबरदारी घ्या

क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत अाहे. या अाॅनलाइन व्यवहारांवर सायबर हॅकरची नजर अाहे. कार्डचे लिमिट वाढवण्यासाठी अाणि खरेदी करणाऱ्या संकेतस्थळांचे हुबेहूब क्लोन साइट बनवत ग्राहकांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढत अाहे.

अधिकृत संकेतस्थळ तपासा

ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट किंवा ऍपचे पुनरावलोकन वाचणे ही सर्वात महत्त्वाची सुरक्षितता आहे. ऑनलाईन खरेदी करतांना बहुतांशी वेळा क्लोन केलेल्या संकेतस्थळावर क्लिक करुन फसवणूक होण्याची शक्यता असते. अशा वेळी संकेतस्थळाच्या अधिकृत लिंक असल्याची खात्री करा.

फसवणूक टाळण्यासाठी हे नियम पाळा

कार्ड नेहमी सोबत ठेवा. कार्ड कधीही नजरेआड सोडू नका, खरेदी विक्रीच्या ठिकाणी स्वाइप करावे लागते. विक्रेत्याने दुकान किंवा रेस्टॉरंट किंवा पेट्रोल पंपावर समक्ष कार्ड स्वाइप केल्याची खात्री करा. पिन नियमितपणे बदला, सोपे नंबर असलेले पिन ठेवू नका. तीन ते चार महिन्यांनी बदला. मोबाइलवर आलेले अलर्ट आणि बँक खात्याचे मासिक क्रेडिट कार्ड स्टेटमेंट नियमित तपासा. बँकेकडून क्रेडिट कार्ड व्यवहारांशी संबंधित मेसेज अाणि अलर्ट नियमित बघा खात्री करा. बँक खात्यात असलेली अधिकृत रक्कम तपासा कधी कधी सायबर हॅकर बँकेत मोठी रक्कम वर्ग करतात. यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.

- Advertisment -

ताज्या बातम्या