Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या‘नाशिक 151’निमित्त वर्षभर महोत्सवांची रेलचेल

‘नाशिक 151’निमित्त वर्षभर महोत्सवांची रेलचेल

नाशिक । प्रतिनिधी

1 मे 2021 ते 22 या वर्षभरात ‘नाशिक 151’ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होऊन नाशिकबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. याबाबतचे वेळापत्रक नाशिकमध्ये होणार्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलनात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

- Advertisement -

नाशिक जिल्हा निर्मितीला 151 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने नाशिकची शक्तीस्थळे समोर आणण्यासाठी यंदा ‘नाशिक वन फिफटी महोत्सव’ राबविण्याचा संकल्प जिल्हाधिकार्‍यांनी मांडला आहे. यासाठी शासनाकडून 25 कोटींचा निधी मिळणार आहे. वर्षभर विविध महोत्सवांची पर्वणी, कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. प्राचीन काळापासून स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व जपणार्‍या आपल्या जिल्ह्याची वेगळी ओळख आहे

.प्रशासकिय नव्हे तर नाशिककरांचा महोत्सव वर्षभर चालणार आहेत. याव्दारे जिल्हयाच्या वाटचालीचा गौरवशाली पट आणि येथील लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये जगापुढे आणण्याचा मानस आहे. दक्षिणवाहिनी गोदामाई, प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श, कुंभमेळ्याची नगरी, प्राचीन तीर्थक्षेत्र, द्राक्षपंढरी, वाइन कॅपिटल म्हणून प्राचीन कालखंडापासून आधुनिक काळापर्यंत नाशिकने वेगळेपण जपले आहे. कृषी क्षेत्रात देशात अग्रेसर असणारा हा जिल्हा आणि मुंबई-पुणे या शहरांचा त्रिकोण सांधणारे केंद्र म्हणून नाशिकचे वेगळे अस्तित्व आहे.

सूचनांचा पाऊस

महोत्सव बाबत नियोजन व चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नाशिक मधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तर त्यांनी विविध सुचना देखील केल्या. नाशिकमध्ये एक कायमस्वरुपी संग्रहालय तयार करुन गत 150 वर्षात झालेल्या महान लोकांच्या फोटो व त्यांची माहिती उपलब्ध करुन देण्यात यावी, जेणेकरुन नवीन पिढीला देखील आपला इतिहास समजेल, असे सावंत बंधू यांनी सांगितले.तर नाशिकच्या विविध लोककला, लोकगिते यांच्यासाठी देखील स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, अशी मागणी संजय गिते यांनी केली.

सायकलीस्ट आसोसिएशनच्या मनिषा रौंदळ यांनी स्लो सायकलची चेन नाशिक त्र्यंबक रसत्यावर करुन विश्वविक्रम करण्याचा मानस व्यक्त केला. ज्येष्ठ नेते डॉ. कैलास कमोद यांनी नाशिकचा इतिहास बाबत सुचना केली, अमित सोमाणी, किरण जोशी, किशोर अहिरराव, प्रशांत परदेशी, सचिन बागड, आरजे भूषण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नाशिकमध्ये होणार्‍या कार्यक्रमबद्दल सुचना केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या