Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात खते, बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध

जिल्ह्यात खते, बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

खरीप हंगाम 2023 करता शासनाकडून युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचे एकूण 2.23 लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे.

- Advertisement -

आजअखेर जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून शेतकर्‍यांनी शक्य असल्यास कृषी निविष्ठांची खरेदी करण्यास सुरुवात करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी केले आहे.

जिल्ह्यात युरिया खत 36 हजार 558 मेट्रिक टन, डीएपी 16,690 मेट्रिक टन, एमओपी 1 हजार 724, एसएसपी 14,705 मेट्रिक टन व संयुक्त खते 66 हजार 874 मेट्रिक टन असे एकुण 1 लाख 36 हजार 599 मेट्रीक टन खते उपलब्ध आहेत.

त्याचप्रमाणे जिल्ह्याकरीता कापुस, भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमुग, तुर, मुग व उडीद इत्यादी पिकांचे एकुण 86 हजार 931 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहेत. तसेच कापूस पिकाच्या विविध वाणांचे एकुण 1 लाख 38 हजार 700 पाकिटांचा पुरवठा जिल्ह्यात झालेला असून जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या