Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यालॉकडाऊन टाळण्यासाठी पावती शेवटचा पर्याय

लॉकडाऊन टाळण्यासाठी पावती शेवटचा पर्याय

नाशिक । प्रतिनिधी

शहरात करोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर महत्वाचा आहे. मात्र नागरीकांमधील करोनाची भिती कमी झाल्याने नागरिक करोनाचे नियम पाळत नाहीत. यामुळेच बाजारपेठांमध्ये शुल्क आकारुन विनाकारण होणारी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- Advertisement -

प्रशासनाने अल्टीमेट दिला असून लॉकडाऊन टाळण्यासाठी हा शेवटचा पर्याय आहे. ही उपायोजना नागरीकांसाठीच असून सर्वांनी त्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पांडे म्हणाले, महाराष्ट्र पोलीस कायद्यात पोलिसांनाही साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी होणार्‍या ठिकाणी विशेष शुल्क आकारणीचे अधिकार पोलीस आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहे. तसेच हा कायदा फक्त महाराष्ट्र पोलीस कायद्यात असल्याचे तसेच या कायद्याची अंमलबजावणी राज्यात प्रथमच नाशिक शहरात केल्याचे त्यांनी नमुद केल.

प्रत्येकाच्या दैनंदिन गरजा महत्वाच्या असल्याने लॉकडाऊनचे संकट टाळण्यासाठी बाजारपेठांमध्ये प्रवेशासाठी शुल्क हा अंतिम पर्याय आहे. या नियोजनानंतरही बाजारपेठांमधील गर्दी कमी न होता संसर्ग वाढताच राहिला तर लॉकडाऊन होऊ शकतो. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक पर्याय अवलंबले जात आहे.

लॉकडाऊन टाळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून त्यास नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. शुल्क आकारणीमुळे बाजारपेठांमधील गर्दी कमी झाली आहे. सर्व आस्थापना वेळेत बंद होत असून सुरक्षाही होत आहे. या नियमात काही त्रुटी असल्यास त्यादेखील दूर केल्या जातील. तसेच उर्वरीत बाजारपेठांमध्ये हळू हळू हाच नियम करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हमी द्या कारवाई मागे घेतो

त्या त्या बाजार पेठांमधील व्यापारी संघटना अगर कोणी त्या बाजारपेठ परिसरात येणारे नागरिक सामाजिंक अंतर पाळतील, मास्कचा वापर करतील व करोना अटोक्यात आणतील अशी हमी घेतल्यास आपण पाच रूपये पावतीची सुरू केलेली कारवाई मागे घेण्यास तयार आहोत असे आव्हान पोलीस आयुक्त पांडे यांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या