<p>मुंबई </p><p>देशातील उत्तरेत बर्फवृष्टी सुरू असल्याने अनेक भागात जनजीवन विस्कळती झाले आहे. याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आलेली आहे. आज सकाळी नाशिकचा पार ८.४ अंशांवर तर निफाडचा पार ६.५ अंशांवर स्थिरावला.</p>.<p>उत्तर महाराष्ट्रातील तापमान चांगलेच घसरले आहे. जळगाव ९ अंशावर तर धुळे ८ अंशावर आहे. नाशिक ८.४ अंशावर तर अहमदनगर १० अंशावर आहे. राज्यात येत्या दोन दिवसांत थंडीची लाट येईल, असा इशाला हवामान खात्याने दिला आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात हवामानात गारठा जाणवू लागला आहे. त्यामुळे थंडीच्या तापमानाने एकेरी आकडा गाठल्याचे समोर आले आहे.</p>