सत्य, अहिंसेचा मूलमंत्र देणारे महात्मा गांधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती विशेष
सत्य, अहिंसेचा मूलमंत्र देणारे महात्मा गांधी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रपिता महात्मा गांधी Father of the Nation Mahatma Gandhi यांची आज 152 वी जयंती. महात्मा गांधींनी नेहमीच सत्य, अहिंसा याचा पुरस्कार केला. त्यांच्या याच तत्वांमुळे देशाच्या जडण-घडणीत मोलाची भर घातली आहे.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने नाशिकमधील तरुणाईने आपले मनोगत व्यक्त करून आदरभाव प्रकट केला आहे. या मूल्यांचा अनेकांनी आपल्या व्यवहारात उपयोग करत, त्यांच्या मूल्यांंना खर्‍या अर्थाने न्याय दिला. यात अनेक तरुण मंडळीदेखील सत्य, अहिंसा याच्याशी आपली बांधीलकी समजतात आणि त्याचा अंमलही करतात.

सत्य, अहिंसा, न्यायचा मार्ग दाखवून, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या विचारांनी मोलाचे योगदान राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिले आहे. गांधीची तत्व, विचार आणि त्यांनी दिलेली बहुमोल शिकवण त्यांच्या नावाप्रमाणेच अमर आहे. जगातील प्रत्येक पिढीला गांधीजींचे विचार प्रेरक ठरतात. आज भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. महासत्ता होण्यामध्ये भारतातील युवक वर्ग महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. त्यात गांधींचे विचार आणि त्या तत्त्वांचे अनुकरण महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येते.

प्रणाली मौले, विद्यार्थिनी, टीवायबीकॉम

सत्य आणि अहिंसा ही दोन तत्त्वे गांधीजींनी समाजात रुजवली आहेत. सत्य म्हणजे जे आपल्याला सत मार्गाकडे घेवून जाते, सत्यमेव जयते म्हणजे सत्याचा नेहमी विजय झालेला आहे. अहिंसा परमोधर्म, अहिंसा हा धर्म आहे. अहिंसेने कुठल्याही संकटावर मात करता येते. विजय मिळवता येतो. अहिंसा हा जीव दया दाखवण्याचा मार्ग आहे आणि देशाच्या युवा पिढीचा भाग म्हणून गांधीजींचे हे तत्त्व नेहमीच प्रेरक राहिले आहे.

ईश्वरी कतवारे,विद्यार्थिनी, एचपीटी

महात्मा गांधी आणि त्यांचे देशकार्य मानव जातीला प्रेरणा ठरते. अहिंसा आणि सत्य या दोन वैश्विक शांततेसाठी उपयुक्त असणार्‍या बहुमोल तत्त्वांचा गांधींनी आयुष्यभर पुरस्कार केला. अशा महान व्यक्तिमत्त्व असलेल्या महात्मा गांधींचे तत्त्व तडफड वृत्ती असलेल्या तरुणांसाठी ही प्रेरणादायी आहेत.

विवेक गोडसे , विद्यार्थी, अभियांत्रिकी

आज आपल्या देशाचा कारभार कुठल्याही हुकूमशाहीशिवाय लोकशाही पद्धतीने शांततापूर्ण व सुरळीत सुरू आहे.या सगळ्यांची शिकवण आपल्याला गांधीचा इतिहास करून देतो. कोणतेही काम अहिंसेच्या, सत्याच्या , न्यायाच्या मार्गाने केले तर ते नक्की सफल होते.

आरती चिड,विद्यार्थिनी,बी फार्मसी

गांधीजींच्या सत्य या मूल्याचा आदर आहे. त्यामुळे नेहमी सत्य तेच बोलतो. त्यांच्या तत्त्वांचे दैनंदिन जीवनात प्रामाणिकपणे कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करींत असतो.

ओम गुप्ता , विद्यार्थी,बारावी

Related Stories

No stories found.