...म्हणून जन्मदात्या पित्याने केली मुलीची हत्या

...म्हणून जन्मदात्या पित्याने केली मुलीची हत्या

धाराशिव | Dharashiv

जिल्ह्यामधील तुळजापूर तालक्यातील (Tuljapur taluka) कार्ला (Carla) येथे किरकोळ कारणावरुन जन्मदात्या पित्याने पोटच्या मुलीची गोळी झाडून (Shot) हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव काजल मनोज शिंदे (Kajal Manoj Shinde) असून ती तिच्या आईवडिलांसोबत पतीसह माहेरी राहत होती. काजलने घरी मटण बनवले होते. त्यानंतर ती घरातील इतर कामांमध्ये व्यस्त असल्याने घरातील कुत्र्याने मटण (Chiken) खाले. हा प्रकार तिची आई मीरा हिने पाहिला आणि ती काजलवर संतापली.

त्यानंतर यावरून आई आणि काजलमध्ये जोरदार भांडण (quarrel) झाले. त्याचवेळी दारुच्या नशेत असलेले काजलचे वडिल गणेश झंप्या भोसले (Ganesh Zhampya Bhosle) हे त्याठिकाणी आले असता त्यांनी गावठी बंदूकीने काजलवर गोळी झाडली. यामध्ये काजल गंभीररित्या जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. यानंतर रुग्णालयात नेतांना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी नळदूर्ग पोलिसात (Naladurga Police) काजलचे पती मनोज शिंदे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या तक्रारीच्या आधारे वडिल गणेश भोसले आणि आई मीरा भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर संशयित आरोपी गणेश भोसले फरार झाला आहे. तर पोलिसांनी मीरा भोसले हिला अटक (Arrested) केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com