Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासत्य‘जित’मध्ये पिताच ‘किंगमेकर’!

सत्य‘जित’मध्ये पिताच ‘किंगमेकर’!

नाशिक । फारूख पठाण | Nashik

मागील पंधरा वर्षांपासून विधानसभेच्या (Legislative Assembly) नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) एक हाती वर्चस्व गाजवणारे

- Advertisement -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुधीर तांबे (Congress senior leader Dr. Sudhir Tambe) यांनी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील लोकांशी आपुलकीचे नाते निर्माण केले. त्यांच्याशी चांगला संवाद ठेवला.

या सामर्थ्याच्या जोरावर नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत (election) त्यांचे पुत्र सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचा विजय सोपा झाला यात शंका नाही. मात्र त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) हेच किंगमेकरच्या (Kingmaker) भूमिकेत राहिले. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात नाशिकसह (nashik) अहमदनगर (Ahmednagar), जळगाव (jalgaon), धुळे (dhule), नंदुरबार (nandurbar) या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. यातील प्रत्येक जिल्ह्याचे राजकीय गणित अत्यंत वेगळे-वेगळे आहे.

तरीही गेल्या पंधरा वर्षापासून आमदार असताना डॉ. सुधीर तांबे यांनी सर्व जिल्ह्यांत आपली पकड निर्माण केली होती. त्यात त्यांनी विविध राजकीय पक्षांच्या ( political parties) नेत्यांसह सामान्य नागरिक तसेच विविध क्षेत्रांत काम करणार्‍या लोकांशी नाते जोडले. प्रत्येकाच्या सुख-दुःखात सामील होताना त्यांनी संवाद कायम ठेवला. आपण आमदार आहोत अथवा मोठ्या परिवाराचे सदस्य आहोत याचा त्यांनी कधीही गाजावाजा केला नाही.

अत्यंत संयमी तसेच मित्र म्हणून कायम साथ देणार्‍या डॉ. तांबे यांचा मित्रपरिवार सतत वाढत गेला. हे सर्व करीत असताना त्यांनी शिक्षकांसह पदवीधरांचे प्रश्न शासन दरबारी मांडून आपली भूमिका योग्यपणे बजावली. त्यामुळे विविध शिक्षक संघटनांसह सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या लोकांचा कल त्यांच्याच बाजूने राहिला.

काँग्रेस पक्षाशी (congress party) एकनिष्ठ राहून त्यांनी पक्षाचे काम निष्ठेने केले. मागील तीन निवडणुका त्यांनी सोप्या पद्धतीने जिंकल्या. मात्र यंदाची निवडणूक (election) तांबे परिवारासाठी मोठ्या पराकाष्टाची ठरली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही मिनिटांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्रात एक प्रकारे राजकीय भूकंप आल्यासारखे झाले.

पक्षाने मुलाला अधिकृत उमेदवारी दिली नसल्याने अपक्ष म्हणून ते मैदानात राहिले तर काँग्रेस पक्षाने अपक्ष उमेदवारी करणार्‍या शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. पाटील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार झाल्या. मागील 15 वर्षे आमदार म्हणून काम केलेल्या आणि पिढ्यागत ज्या पक्षात आहे त्या काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई तांबे पिता-पुत्रांवर करण्यात आली.

एकीकडे हक्काचा पक्ष असलेल्यांनी बाहेरचा मार्ग दाखवला तर दुसरीकडे मुलगा अपक्ष म्हणून निवडणुकीत असल्यामुळे वडील म्हणून तसेच ज्येष्ठ नेता म्हणून डॉ. तांबे यांनी अत्यंत संयमाने एकेक पाऊल पुढे टाकत मुलाला आमदार करण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यात त्यांनी तयार केलेले स्नेहसंबंध मोलाचे ठरले. महाविकास आघाडीने सत्यजित तांबे यांना साथ दिली नाही तरीही

डॉ. तांबे यांच्यामुळे काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी सत्यजित यांच्यासाठी काम केल्याचे दिसून आले. विरोधाचे वातावरण निर्माण झाले असताना सत्यजित यांनी विजय खेचून आणला. आता त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत उत्तर महाराष्ट्रात मित्र परिवार तयार करावा आणि आपली वेगळी प्रतिमा निर्माण करावी. तसे झाले तर पुढील काळात त्यांना आता आलेल्या अडचणी येणार नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या