बांधावरून खते उचलण्यास जिल्हय़ातील शेतकर्‍यांचा प्रतिसाद

कृषीविभागाच्या योजनेचा शेतकर्‍यांना होतोय फायदा
बांधावरून खते उचलण्यास जिल्हय़ातील शेतकर्‍यांचा प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कृषी विभागाच्या ( Dept of Agriculture ) बांधावरून खते, बियाणे देण्यास या उपक्रमास नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा ( farmers ) प्रतिसाद मिळतोय, आतापर्यंत जिल्ह्यातील 26 हजार 824 शेतकर्‍यांनी तब्बल 6 हजार 770 मेट्रिक टन खत बांधावरून घेतले, कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकरी वर्गाची चांगलीच सोय झाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकर्‍यांनी बाजारात जाणे टाळावे, याकरिता राज्य शासनाने थेट बांधावर खते पुरविण्याची योजना आखली आहे.

खरीप हंगाम संपेपर्यंत शेतकर्‍यांना थेट त्यांच्या गावात खते बियाणे पुरविली जाणार आहे. नाशिक जिल्हयातील शेतकर्‍यांना 1 हजार 886 गटाद्वारे विविध कंपन्यांचे रासायनिक खते देण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात ही संख्या आणखीन वाढणार आहे.

दरम्यान मागील वर्षी प्रमाणे राज्यात कोरोना असल्याने शेतकरी वर्गाकडून खते, आणि बियाणे घेण्यासाठी बाजारात मोठी गर्दी होण्याची भीती असल्याने कृषी विभागाकडून गेल्या वर्ष भरापासून खरीप हंगामात खते दिली जात आहे. कृषी विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमामुळे कोरोना संकटात शेतकर्‍यांची होणारी पळापळ काहीशी थांबली आहे . शेतकर्‍यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत करून ठेवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने काही निर्बंध घातले आहे.

कृषी विभागाने गावोगावी शेतकर्‍यांचे गट स्थापन करून त्या गटातील शेतकर्‍यांना एकत्र करून त्यांना आवश्यक असलेली खते व बियाणांची मागणी लक्षात घेऊन तालुक्यातील मुख्य डीलरकडे खताची मागणी केली जाते. खताची किंवा बियाणांची मोठ्या प्रमाणावर मागणी असेल तर थेट कंपनी प्रतिनिधीशी बोलून डीलरचा दर किंवा त्यापेक्षाही कमी दराने खते व बियाणे ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली जात आहे. यातून शेतकर्‍यांना शहराच्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठीचा खर्च तसेच वाहतूक खर्चाची बचत होत आहे. तसेच कोरोना संसर्गापासून सुरक्षितपणे खते आणि बियाणे मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात नाशिकच्या शेतकर्‍यांचा जसा प्रतिसाद मिळतोय, तो विभागातून प्रथम क्रमांकावर आहे,

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com