Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकऱ्यांची उन्हाळ टोमॅटो लागवडीला पसंती

शेतकऱ्यांची उन्हाळ टोमॅटो लागवडीला पसंती

ओझे | विलास ढाकणे | OZE

दिंडोरी तालुक्यात ( Dindori Taluka) यंदा उन्हाळ टोमॅटो लागवडीला (Tomato cultivation) मोठ्या प्रमाणात प्रारंभ झाला असून मागील संपूर्ण खरिप हंगामात टोमॅटोला बाजारभाव न मिळाल्यामुळे खर्च झालेले भांडवलही वसूल न झाल्यामुळे सध्या शेतकरी (Farmer) वर्गाने उन्हाळ टोमॅटो लागवडीस पसंती दिल्याचे दिसून येत आहे…

- Advertisement -

चालूवर्षी वातावरण बदलाचा मोठा फटका खरीप हंगामाला (Kharif Season) बसल्यामुळे भाजीपाला पिकासह सोयाबीन, भुईमूग, उडीद मूग व भाताच्या पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे बळीराजाने आपले लक्ष उन्हाळी हंगामात वेलवर्णीय पिके तसेच भाजीपाला पिकाकडे केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात झालेला तोटा व खर्च झालेले भांडवल वसूल करण्यासाठी बळीराजा पुन्हा एकदा सज्ज होताना दिसून येत आहे.

तसेच ज्या शेतकर्‍यांकडे बारमाही पाण्याची सोय आहे अशा शेतकर्‍यांनी आपल्या शेतात (Farm) कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक, घेवडा, दुधी भोपळा, कारले, दोडका, काकडी, चवळी, सिमला मिरची या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याचे चित्र दिसून येत आहे. बळीराजा सध्या भाजीपाला लागवडीसाठी नर्सरीतील रोपांना पसंती देत असून नर्सरीतील रोपे हे बंदिस्त वातावरणात असल्यामुळे रोगमुक्त असतात. त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शेतकरी घरी रोपे तयार करताना दिसत नाही.

तर काही शेतकरी दोडका, दुधी भोपळा, कारले या वेलवर्गीय पिकांची सरीवर टोकन पद्धतीने लागवड करत आहेत. या टोकन पद्धतीमुळे नर्सरीमध्ये रोप तयार करण्याचा खर्च वाचत आहे. उन्हाळी हंगामामध्ये सर्व भाजीपाला पिकांची लागवड करताना सर्व शेतकरी सरीवर ठिबक सिंचन टाकून त्यावर पीक तणमुक्त राहण्यासाठी मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर होता आहे. या मल्चिंग पेपरमुळे लागवड केलेले पीक तणमुक्त राहून रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असून पाण्याची बचत होते. त्यामुळे सध्या शेतकरी ठिबक सिंचनसह मल्चिंग पेपरचा वापर करताना दिसत आहेत.

दरम्यान, दुसरीकडे मात्र पिकाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल होताना दिसत आहेत. खरीप हंगामात पिकाला भाव न मिळाल्यामुळे बळीराजाने आता उन्हाळी हंगामातील विविध भाजीपाला पिकांकडे आपले लक्ष केंद्रित केल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या