शरद पवारांच्या हस्तक्षेपानंतर शेतकऱ्यांची गडकरींशी भेट

शरद पवारांच्या हस्तक्षेपानंतर शेतकऱ्यांची गडकरींशी भेट

नाशिक | प्रतिनिधी

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्तक्षेपानंतर मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दिल्लीत शेतकऱ्यांची बैठक पार पडली. यात भूसंपादन मोबदल्याबाबत फेरविचार करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्याचे निर्देश गडकरी यांनी विभागाला दिले.

यावेळी हा प्रश्नी माजी जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची सूचना शरद पवारांनी केल्यानंतर त्याला गडकरींनीही मंजूरी दिली. यावेळी यावेळी न्हाईचे अधिकारी, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार, प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी गोकुळ पिंगळे, नाशिक जिल्हा संघर्ष कृती समिती अध्यक्ष अॅड.प्रकाश शिंदे उपस्थित होते.

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी प्रशासनाने रस्त्यासाठी घेतलेल्या जमिनीचा अत्यल्प मोबदला देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, नाशिक, दिंडोरी व सुरगाणा अशा पाच तालुक्यातील एक हजार हेक्टर जमीन बाधित आहे. भूसंपादनाच्या बदल्यात देण्यात येणारा मोबदला घेण्यास शेतकरी तयार नसून, त्यांनी थेट महामार्गालाच विरोध केला आहे.

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने (दि. ३ सप्टेंबर) शरद पवार यांची भेट घेतली होती.भूसंपादनाच्या अत्यल्प मोबदल्याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकऱ्यांनी पवारांकडे केली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दोन दिवसांत भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पवार यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले होते.

त्यानंनतर नाशिक जिल्ह्यासह नगर,उस्मानाबाद,सोलापूर येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांना पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी उचस्तरीय कमिटी नियुक्त करण्याचे तात्काळ आदेश दिले.ही समिती माजी जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली असावी अशी सूचना पवार यांनी केल्यानंतर त्यालाही गडकरींना मान्यता दिली. यावेळी तीन महिन्यात सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिली

गडकरींकडून पिंगळेंची सूचना मान्य

राष्ट्रीय महामार्गावर स्पीड गन लावण्यात आल्या असून ४०,६० किलोमीटर स्पीडचे बोर्ड लावण्यात आले आहेत.महामार्गावर वाहने भरधाव वेगाने असतांना,४०,६० असा स्पीडची मर्यादा योग्य नसून स्पीडगनकडून वाहनधारकांची लूट केली जात असल्याची सूचना गोकुळ पिंगळे यांनी बैठकीत केली.

त्याची दखल घेत,गडकरी यांनी महामार्गावर ८० ते १०० किलोमीटर पर्यंतची स्पीड मर्यादा यापुढे ठेवावी,४० ते ६० किलोमीटरचे बोर्ड असतील,तर ते रस्त्यांवरून काढून टाकण्याच्या सूचना गडकरींनी न्हाईला केल्या आहेत.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com