Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याद्राक्षाला अल्प दर; शेतकरी रडकुंडीला!

द्राक्षाला अल्प दर; शेतकरी रडकुंडीला!

नैताळे। वार्ताहर Naitale

अस्मानी, सुलतानी संकटाने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grapes Grower Farmer )हतबल झाला आहे. द्राक्ष विकली जात नाही आणि वरून दररोज पाऊस, गारपिटीचा रोजच जोरदार तडाखा सुरू आहे. माल तयार आहे. पण, व्यापारी घ्यायला तयार नाही. व्यापार्‍याला फोन केला तर व्यापारी म्हणतो 15 ते 20 रुपये किलोप्रमाणे भाव आहे. पाऊस व गारपिटीच्या भीतीने शेतकरी याच दराने का होईना माल घेऊन जा अशी विनवणी व्यापार्‍याला करीत आहे. अशी परिस्थिती सध्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांची झाली आहे.

- Advertisement -

गेल्या दहा-बारा वर्षांपासून द्राक्ष शेतीला उतरती कळा लागली आहे. गारपीट, अवकाळी पाऊस, नोटबंदी, करोनामुळे हंगाम दर हंगाम द्राक्ष उत्पादीत करणे व विक्री करणे खूप अवघड होत चालले आहे. दिवसेंदिवस रोगांचा प्रादूर्भाव वाढत चालला आहे. मजुरी वाढली आहे. डिझेल, खते, औषधांचे दर दरवर्षी वाढतच आहे. एकरी होणारा खर्च मागील पंधरा ते वीस वर्षात पाचपट वाढला आहे. त्या तुलनेत द्राक्षाचे भाव दुप्पट सुद्धा झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला. बँका, सोसायट्या थकल्या. पुढचा हंगाम चांगला जाईल, अशा भाबड्या आशेतून दुसर्‍या पिकातून निघणारे पैसे द्राक्ष बागेचे भांडवलात गुंतवले. परंतु, आज नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची अशी वाईट परिस्थिती झालेली आहे.

चार ते साडेचार महिन्यात द्राक्ष विक्री होऊन बाग खाली होणे आवश्यक असते. परंतु, साडेपाच-सहा महिन्याचे रान झाले. अद्याप खाली झालेले नाही. शेतकरी व्यापार्‍यांना फोन करतो. व्यापार्‍यांकडे जातो. परंतु, व्यापारी जागेवरच सांगतात माझा 15 ते 20 रुपये किलोने भाव चालू आहे. शेतकरी या कमी भावाने माल देऊन रान खाली करून घ्या म्हणून विनंती करीत आहे. अशी बिकट परिस्थिती द्राक्ष उत्पादकांची आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांना मदत करणे आवश्यक आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस गारपीट होत आहे. शेतातील कोणतेच पीक शेतकर्‍यांच्या हातात येणार नाही. त्यामुळे शेती कर्जाची वसुली थांबविण्याचे आदेश शासनाने देऊन शेतकर्‍यांना पुढील हंगामासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे.

बापू बोरगुडे, द्राक्ष उत्पादक, नैताळे

कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने यंदा शेतकर्‍यांचा संपूर्ण हंगाम तोट्यात चालला आहे. पुढील वर्षाच्या हंगामासाठी भांडवल कसे उभे करावे, अशी चिंता शेतकर्‍यांना आहे. प्रवीण

तळेकर, द्राक्ष उत्पादक, रामपूर

- Advertisment -

ताज्या बातम्या