Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या'या' नियमामुळे शेतकरी अडचणीत

‘या’ नियमामुळे शेतकरी अडचणीत

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad Industrial Estate) शेतकऱ्यांच्या (farmers) असलेल्या जमिनींना एमआयडीसीच्या (MIDC) पाच मीटर रस्त्याच्या लेआउटमुळे एन. ए. (NA) करण्याकरिता महापालिकेत अडचण येत असल्याने शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे.

- Advertisement -

नाशकात औद्योगिक वसाहत (Industrial estate) सुरु करण्याकरिता एमआयडीसीने शेतकऱ्यांकडून जमीन घेतल्या. त्यानंतर एमआयडीसीने सदरहू शेत जमिनींवर ले आउट टाकून एसटीपी प्लांट (STP Plant), पोलीस ठाणे (Police Station), हेलिपॅड (Helipad) साठी जागा आरक्षित करण्यात आली होती मात्र हे सर्व आरक्षित प्रकल्प अद्यापही कागदावरच आहेत.

नाशकात हजारो हेक्टरवर एमआयडीसीची स्थापना करण्यात आली मात्र याठिकाणी सांडपाणी (waste water) व पावसाळी पाणी (rain water) वाहून जाण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्थाच (Drainage system ) करायचा विसर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना पडला. कालांतराने एमआयडीसीने त्यांच्याकडे असलेले रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करून ड्रेनेजची व्यवस्था करण्याचे काम आता महापालिकेचे आहे असे सांगून आपली जबाबदारी झटकून टाकली.

मात्र हे सर्व होतअसतांना अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad Industrial Estate) असलेल्या काही केमिकल कंपन्यांनी त्यांचे केमिकल नाल्यांत व बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर सोडून देण्यात आले तर बऱ्याच कंपन्यांना त्यांचे सांडपाणी नाईलाजास्तव पावसाळी नाल्यांमध्ये सोडावे लागले. सांडपाणी व केमिकलयुक्त पाणी (Chemical water) जमिनीत झिरपल्याने व ते पाणी बऱ्याच ठिकणी शेतीसाठी वापर करण्यात आल्याने बऱ्याच जमिनी नापीक झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

काळानुसार एमआयडीसीमध्ये (MIDC) जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीसाठी उपजीविका चालवण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या शेतीचा वापर कसा करावा याकरिता जागा डेव्हलप करण्यासाठी महापालिकेत प्रस्ताव सादर केला असता महापालिकेने सदर प्रस्ताव रद्द केला. याचे कारण म्हणजे एमआयडीसीने लेआउट मध्ये शेतीसाठी दिलेला वहिवाटीचा रस्ता हा ५ मीटर असल्याने शेती एनए (बिगरशेती) करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे जागा असूनही भूधारकाला उपजीविका चालवण्यासाठी काय करावे असा प्रश्न पडला आहे.

महापालिका व एमआयडीसी अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून औद्योगिक वसाह्तीलगत असलेल्या शेतकऱ्यांना सोबत घेत त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. एमआयडीसी परिसरात एसटीपी प्लांट व ड्रेनेजची व्यवस्था झाल्यास नाशकात उद्योग वाढीला देखील चालना मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या