Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! मंत्रालयात शेतकऱ्यांचे आंदोलन; सुरक्षा जाळ्यांवर मारल्या उड्या, नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी! मंत्रालयात शेतकऱ्यांचे आंदोलन; सुरक्षा जाळ्यांवर मारल्या उड्या, नेमकं प्रकरण काय?

मुंबई | Mumbai

मंत्रालयातील (Mantralay ) मुख्य इमारतीच्या आवारात पहिल्या माळ्यावर कुणीही उडी मारुन आत्महत्या (Suicide) करु नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्त जाळी बांधण्यात आली आहे. मात्र, अशातच आता मंत्रालयातील सुरक्षा जाळ्यांवर (Safety Nets) उड्या मारून अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंत्रालयात मोठा गोंधळ उडाला आहे…

- Advertisement -

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने वर्तविला ‘हा’ अंदाज, वाचा सविस्तर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्याच्या (Amravati District) मोर्शी (Morshi) येथे अप्पर वर्धा धरण (Upper Wardha Dam) आहे. या धरणग्रस्तांचे गेल्या १०३ दिवसांपासून मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन (Agitation) सुरु आहे. पंरतु, त्यांच्या आंदोलनाची दखल कुणीही घेत नसल्याने त्यांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नव्हता. त्यामुळे या आंदोलकांनी थेट मंत्रालय गाठत आगळ्यावेगळ्या पद्धतीचे आंदोलन केले.

Maharashtra Government : राज्यातील दुष्काळ नियंत्रणासाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

विशेष म्हणजे मंत्रालयात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत. ते विविध बैठका आणि आपल्या कामांमध्ये व्यस्त आहेत, असे असताना आज मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन केले. या आंदोलकांनी आधी मंत्रालयात प्रवेश घेतला. त्यानंतर जाळीवर चढून निदर्शने करण्यास सुरुवात केली.

Sanjay Raut : …तर लोकांना बोलावून एका भागात ट्रेनवर दगडफेक केली जाईल; संजय राऊतांनी व्यक्त केली मोठी भीती

दरम्यान, या आंदोलनानंतर पोलिसांनी (Police) १२ ते १५ शेतकऱ्यांना (Farmers) ताब्यात घेतले असून त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात (Azad Maidan Police Station) पाठवले आहे. तसेच या शेतकऱ्यांनी उद्यापर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या