ट्रॅक्टर रॅलीसाठी शेतकऱ्यांनी दिला रुट प्लॅन

ट्रॅक्टर रॅलीसाठी शेतकऱ्यांनी दिला रुट प्लॅन

नवी दिल्ली :

कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन आज ६० व्या दिवशीही सुरूच आहे. याच दरम्यान शेतकऱ्यांनी 'प्रजासत्ताक दिनी' म्हणजेच २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. त्यासाठी पोलिसांना लिखित परवानगीदेखील मागितली आहे. त्यात आपला रुट प्लॅन दिला आहे.

कृषी कायद्यांविरोधात निषेध नोंदवण्यासाठी शेतकरी संघटना ट्रक्टर रॅली काढणार आहे. त्यासाठी तीन सीमांची निश्चिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली संदर्भात पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत.

दिल्ली पोलिसांकडून मिळो अथवा न मिळो, परंतु, राजधानी दिल्लीच्या आउटर रिंग रोडवर आम्ही रॅली काढणार, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. शेतकरी नेते आणि पोलीस अधिकारी यांच्या बैठकीत ट्रॅक्टर रॅलीसाठी ज्या मार्गांवर चर्चा करण्यात आली आहे, त्याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com