कृषी विधेयकावरील आंदोलनास हिंसक वळण

कृषी विधेयकावरील आंदोलनास हिंसक वळण

नवी दिल्ली

कृषी विधेयकास दिल्ली, हरियाणा व पंजाबमधून मोठा विरोध होत आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

दिल्ली, हरियाणा व पंजाबमधून सुरु असलेला विरोधाने हिंसक स्वरुप धारण केले आहे. सोमवारी सकाळी इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला. पंजाब युवक काँग्रेसच्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी हा ट्रॅक्टर पेटवून दिला. सकाळी सात वाजून ४२ मिनिटांनी इंडिया गेटवर ट्रॅक्टरला आग लावण्यात आल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या दोन गाडया तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कँप्टन अमरिंदर सिंह आज शहीद भगत सिंह नगरमध्ये धरणे आंदोलन सुरु केले. राज्यात हा कायदा लागू न करण्यावर विचार सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com