Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने आणले अश्रू; दर घसरताच केली कांद्याची होळी

शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने आणले अश्रू; दर घसरताच केली कांद्याची होळी

नाशिक | Nashik

कांद्याचे (onion) भाव सातत्याने घसरत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) चिंताग्रस्त झाला आहे. लाखो रुपये खर्च करून बाजारात कांद्याला प्रति क्विंटल अवघे ३०० ते ४०० रुपये मिळतात. त्यामुळे कांदा बाजारात (Market) नेण्यासाठी आणखी खर्च करण्याऐवजी येवला तालुक्यातील (Yeola Taluka) मातुलठाण येथील एका शेतकऱ्याने आज होळीच्या दिवशी शेतात कांद्यांची होळी (Holi) करून कांदा पेटवून दिला….

- Advertisement -

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत अवकाळीचे सावट

याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा डोंगरे असे या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नाव असून कांद्याच्या प्रश्नाकडे सरकारचे (Government) लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज होळीच्या दिवशी सरकारविरोधात शिमगा केला. कांद्याला बाजारात भाव मिळत नसल्याने डोंगरे यांनी आपल्या शेतात दीड एकरवर उभे असलेले कांद्याचे पीक सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करत होळी करून पेटवून (Burning) दिले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयकडून छापेमारी

दरम्यान, कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत अगदी पोटच्या मुलाप्रमाणे पिकाची (Crop) काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांवर स्वतच्या हातानेच जड अंतःकरणाने कांद्याचे पीक उपटून त्याची होळी करण्याची वेळ आली आहे. बाजारात भावच नसल्याने शेतातील कांदा बाजारात नेऊन उपयोग काय? त्यापेक्षा तो शेतातच जाळलेला बरा,अशी मनःस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे डोंगरे कुटुंबातील महिला व लहान मुलांनी पाणावलेल्या डोळ्यांनी कांद्याला अग्निडाग दिला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या