Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याबापरे! उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात 'ऐवढी' घसरण

बापरे! उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात ‘ऐवढी’ घसरण

निफाड। आनंदा जाधव | Niphad

दिवाळीत (diwali) कांद्याची (onion) टंचाई जाणवू नये यासाठी केंद्र सरकारने (central government) अफगाणिस्तानमधून (Afghanistan) कांदा आयात (Onion import) केल्याने व त्यातच जिल्ह्याच्या कसमा पट्टयातील लाल कांदा (red onion) बाजारपेठेत दाखल झाल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात उन्हाळ कांद्याच्या भावात (Onion prices) क्विंटलमागे 600 रुपयांनी घसरण झाली आहे.

- Advertisement -

साहजिकच दसर्‍यानंतर कांद्याचे भाव वाढतील ही शेतकर्‍यांची (farmers) अपेक्षा फोल ठरू लागली असून दिवसागणिक कांद्याचे कोसळते भाव शेतकर्‍यासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. यावर्षी सुरुवातीचा व नंतर परतीच्या पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तर साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकर्‍यांनी उन्हाळ कांदा चाळीत साठवून ठेवला होता.

मात्र परतीच्या पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचा कांदा ओला झाला. त्यातच कांद्याचे वजन देखील घटले. या महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला 4 हजार रु. तर सरासरी 3500 रु. भाव मिळाला. तर मागील आठवड्यात सरासरी 3300 रु. प्रती क्विंटलचा भाव मिळाला. साहजिकच कांद्याला पुढे काही दिवस भाव मिळेल ही शेतकर्‍यांना अपेक्षा होती.

मात्र यावेळी ही अपेक्षा फोल ठरतांना दिसत आहे. कारण काल बुधवारी लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Market Committee) उन्हाळ कांदा सरासरी 2700 रु. प्रती क्विंटलने विकला गेला. परिणामी एका आठवड्यात कांदा बाजारभावात 600 रुपयांनी घसरण झाल्याचे पहावयास मिळाले. दिवसागणिक कांद्याचे भाव कोसळत असल्याने व साठवलेल्या कांद्यात मोठी घट झाल्याने आता या कांद्यावर झालेला खर्च फिटणार की नाही अशी शंका व्यक्त होत आहे.

कांद्याचे भाव वाढू लागल्याने व ऐन दिवाळीत कांद्याची टंचाई निर्माण होवू नये तसेच शहरी ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी केंद्र शासनाने घाईघाईत अफगाणिस्तानमधून कांदा आयात केला. मात्र याच वेळी आता कळवण (kalwan), सटाणा (satana), देवळा (deola), मालेगाव (malegaon) आदी भागातून देखील लाल कांदा बाजारपेठेत विक्रीला येवू लागल्याने उन्हाळ कांद्याच्या भावात दिवसागणिक घसरण होतांना दिसत आहे.

त्यातच उन्हाळ कांद्याची प्रत घसरल्याने त्यास मागणी घटली आहे. साहजिकच बाजारपेठेत व्यापार्‍यांची खरेदी देखील मंदावली आहे. तसेच हा कांदा खराब होवू लागल्याने व्यापारी देखील हा कांदा साठवून ठेवत नसल्याने बाजारभावात घसरण होत आहे. त्यामुळे दसर्‍यानंतर कांद्याचे भाव वाढतील ही शेतकर्‍यांची अपेक्षा यावर्षी फोल ठरली असून आता दिवाळीपूर्वी सर्व कांदा विक्री करण्याचे नियोजन शेतकरी करीत आहेत.

मात्र असे असले तरी देखील परतीच्या पावसाने लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत लाल कांद्याची देखील पाहिजे त्या प्रमाणात आवक होणार नाही. अशा परिस्थितीत कांदा बाजारभाव टिकून राहणे गरजेचे होते. मात्र केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका कांदा उत्पादकांना सहन करावा लागत आहे.

आजच्या परिस्थितीत उमराणा (umrana), नामपूर बाजार समितीत दररोज 60 ते 70 ट्रॅक्टर लाल कांद्याची आवक होत असून त्याचा फटका उन्हाळ कांद्याला बसला असून केंद्र शासनाचे शेतकरी विरोधी आडमुठे धोरण देखील त्यास जबाबदार ठरू लागले आहे. एकूणच ऐन दिवाळीत कांदा शेतकर्‍यांना रडविणार अशीच चिन्हे दिसू लागली आहेत.

शासनाच्या चुकीच्या धोरणाचा शेतकर्‍यांना फटका कांद्याचे भाव पडतात त्यावेळी केंद्र शासन काही एक उपाययोजना करीत नाही. मात्र भाव वाढले की लगेच कांदा आयात केला जातो. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असतांना शेतकरी हीत जपणे गरजेचे आहे. मात्र केंद्रात शेतकरी विरोधी सरकार असल्याने त्याचा फटका शेतकरी, शेतमजूर यांना बसत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल (petrol), डिझेल (diesel), गॅस (gas) जीएसटी (GST) कक्षेत आणणे गरजेचे असतांनाही त्याबाबत निर्णय घेतला जात नाही. मात्र कांद्याचे भाव वाढले की आयातीची तत्परता दाखविली जाते. खरे तर आता शेतकर्‍यांनी संघटीत होणे गरजेचे आहे. शासनानेही शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे

– राजेंद्र बोरगुडे, शेतकरी (नैताळे)

- Advertisment -

ताज्या बातम्या