Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याबोगस डॉक्टरला अटक

बोगस डॉक्टरला अटक

कळवण । प्रतिनिधी Kalwan

तालुक्यातील दळवट येथे कळवण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या फिर्यादीनुसार अभोणा पोलिसांनी कारवाई करीत बोगस डॉक्टराचा भांडाफोड केला आहे. बोगस डॉक्टर विकी शालिंदर जाधव रा. लखमापूर ता. सटाणा याला अटक केली आहे. तालुक्यात आदिवासी दुर्गम भागातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

कळवण हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील आदिवासी समाजाची जुनी पिढी बहुतांशी अडाणी पिढी आहे. स्व. आदिवासी विकास मंत्री ए. टी. पवार यांनी या तालुक्यात शासकीय आश्रमशाळांचे जाळे विणले आहे. त्यामुळे त्यांची पुढची पिढी सुशिक्षित होत आहे, असे असतांना तालुक्यातील दळवट गावात बस स्थानिक समोरील गाळ्यांमध्ये बोगस डॉक्टर विकी शालिंदर जाधव याने अनेक दिवसांपासून आपला दवाखाना थाटला आहे.

प्रांत तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे दळवट गावाची पाहणी करण्यासाठी गेले असता ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार येथे बोगस डॉक्टर असल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील, अभोणा पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, दळवट प्राथमिक अयोग्य केंद्राचे वद्यकीय अधिकारी यांचे निदर्शनास आणून दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्यानुसार चौकशी केली असता बोगस डॉक्टर जाधव यांच्याकडे 31 हजार 621 रुपये किमतीचे वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहित्य व ऍलोपथी औषधे आढळून आले म्हणून दळवट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी भास्कर मन्साराम गवळी यांचे फिर्यादीनुसार भादंवि कलम 419, 420, 276, 336 सह वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 3, 33 (अ ) प्रमाणे अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.

जीवाशी खेळाचा प्रकार थांबेल का?

कळवण तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. अनेक डॉक्टरांनी गाव पुढार्‍यांना हाताशी धरून थाटामाटात दवाखाने सुरु केले आहेत. ते राजरोसपणे सुरु आहेत. याकडे तालुका आरोग्यग्य विभागाचे कायमच दुर्लक्ष झाले आहे. यापुढे तरी या बोगस डॉक्टरांचा बंदोस्त होऊन आदिवासींच्या आरोग्याशी व जीवनाशी खेळाचा प्रकार थांबेल का? असा सवाल आदिवासी बांधवानी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या