
बारामती | Baramati
काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या (Sharad Pawar) जातीचा खोटा दाखला (Fake Caste Proof) सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. या बाबत पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझा जातीचा बोगस दाखला व्हायरल झाला होता. माझा इंग्रजीमधील दाखला काही जणांनी फिरवला. त्यावर ओबीसी लिहलं होतं. जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही. सगळ्या जगाला माहितीय आहे, माझी जात काय आहे.
तसेच मराठा तरुणांची भावना तीव्र आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम करू, असे म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) मराठा समाजाला ( Maratha Society) आश्वासनही दिले आहे. पुढे बोलताना म्हणाले की, मराठा ओबीसीत वाद (Maratha OBC Dispute) नाही. मात्र काही लोक तसं वातावरण तयार करत आहेत. लोकांचे न्याय प्रश्न मात्र सुटले पाहिजेत. असे ही ते म्हणाले.
गेली 50 वर्षापासुनची पद्धत आहे. पाडव्याच्या दिवशी लोक बारामतीत (Baramati) येतात. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. यंदाचं वर्ष वेगळं आहे. कारण यापूर्वी लोक पाडव्यासाठी यायचे, आता पाडव्यापूर्वी लोक येतात आणि सांगतात पाडव्याच्या दिवशी गर्दी खूप असते. त्यामुळे आम्ही आधीच येऊन भेटून जातो. आजकाल दोन दिवस आधीही लोक येतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण इथून लोक आले आणि शुभेच्छा दिल्या. यावर्षी आलेल्यांपैकी 70 टक्के लोक तरुण होते. हे या वेळचं वैशिष्ट्य आहे. तरुणांच्या भवितव्यासाठी काय करता येईल त्याचा प्रयत्न करेन. असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
आज शरद पवारांच्या गोविंद बागेत (Govind Baag) दिवाळी पाडवा पार पडला. यावेळी कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा पार पडला.