Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यास्थलांतर थांबवण्यात अपयश

स्थलांतर थांबवण्यात अपयश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील ( Nashik District ) आठ आदिवासी तालुक्यात ( Tribal Talukas ) उन्हाळ्यात शेतीशी संबंधीत काहीच कामे गावात राहत नसल्याने टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगाराच्या शोधात कुटुंबासह नाशिक निफाड, सिन्नर, येवला या भागात स्थलांतर सुरू झाले आहे.

- Advertisement -

चौदा वर्षांपासून महाराष्ट्रात ग्रामीण रोजगार हमी योजनेची ( Rojgar Hami Yojana ) अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेमागे शासनाचा मूळ उद्देश ग्रामीण व दर्‍याखोर्‍यात राहणार्‍या आदिवासी बांधवांना गावातल्या गावातच रोजगार उपलब्ध करून देणे, रोजगाराकरिता शहराकडे होणारे स्थलांतर थांबविणे, हा होता, परंतु त्यातही अपयश आल्याचेच हे द्योतक असून या आदिवासी बांधवांंना कामासाठी अन्य शहराशिवाय पर्याय उरलेला नाही.

केंद्र व राज्य सरकारकडून रोजगारासाठी अनेक योजना जाहीर होऊनही मनरेगा वगळता अन्य कोणतीही योजना त्याना ज्ञात नाही. शेकडो कोटी रुपये प्रचार प्रसारावर खर्च होऊनही शासकीय योजना त्यांच्यापर्यंंत का पोहोचत नाही. हा मोठा संंशोधनाचा विषय झाला आहे. प्रशानाने त्यांचा विचार करण्याची गरज आहे. अतिदुर्गम पेठ, सुरगाणा, त्रंबक, इगतपुरी, कळवण, सटाणा या भागातील आदिवासींना प्रत्येक वर्षी रोजगारसाठी भटकंती करावी लागते.

गेली दोन वर्षे तर करोनाचे संकट( Corona ) आणि अवकाळी पावसाच्या ( Untimely Rain )फटक्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले होते. आता सर्वत्र जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्याने त्यांना आता आशेचा किरण दिसत आहे. मनरेगावर मिळाणार्‍या रोजगारापेक्षा शहरात बांधकामाच्या ठिकाणी काम केलेले त्यांना परवडत आहे.

कारण हल्ली साध्या मजुरालाला सहाशे रुपये रोज झाला आहे. नवरा, बायकोने कामाला गेल्यास बारशे रुपये रोज घेऊन ते घरी येत आहेत. तेवढा रोज रोजगार हमीवर कधीही मिळत नाही. निफाडला गेले तर द्राक्ष, कांदा आहेत इतर ठिकाणी कांंदा कापणी करता येते, शेती कामावर जाता येते. चार महिने या भागात राहून जेवढी कमाई होते व जीवन सुसह्य पध्दतीने जगता येते, तेवढे गावाकडे शक्य होत नसल्यानेच स्थलांतर कायम आहे.

मागेल त्याला त्याच्याच गावात काम असा नारा राज्य आणि केंद्र सरकार देत असले तरी स्थलांतर त्यामुळेच होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या कुटुंबांना रोजगारासाठी स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय नाही. पावसाळ्यांत रानभाज्या विकून आणि शेतात मजुरीवर काबाडकष्ट करून मुलाबाळांचा उदरनिर्वाह करतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या